अकरावी ऑनलाईन प्रवेश : मुंबई विभागात दोन लाख ३४ हजार प्रवेश

प्रथम प्राधान्य फेरीमध्ये झाल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता
अकरावी ऑनलाईन प्रवेश
अकरावी ऑनलाईन प्रवेशsakal

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश पायदळी तुडवत मुंबईतील केवळ मूठभर संस्थाचालकांचे हित साधणारी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नुकताच पूर्ण झाली. यात मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख ३४ हजार १८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यात सर्वाधिक प्रवेश हे प्रथम प्राधान्य फेरीमध्ये झाल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिक्षण संचालनालयाने मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरात क्षेत्रात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली होती. त्यात अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी, दोन एफसीएफएस फेऱ्या घेण्यात आल्या; मात्र संस्थाचालकांचे हित साधण्यासाठी अकरावी प्रवेशाच्या विशेष फेऱ्या न घेता न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवत ‘प्रथम प्राधान्य’च्या सात फेऱ्या राबवण्यात आल्या. गुणवत्ता नसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना आणि त्यासोबतच अल्पसंख्याकमध्ये दर्जा नसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले आहेत. त्यामुळेही प्रवेश प्रक्रिया अत्यंत बेकायदा आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ठरणारी ठरल्याचा आरोप सिस्कॉम संस्थेने केला आहे.

नागपूर : पाेलिस ठाण्यात युवकाचा संशयास्पद मृत्यू

यंदा पहिल्यांदाच शिक्षण संचालनालयाने अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत अखेरच्या टप्प्यापर्यंत अल्पसंख्याक आणि खाजगी कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन प्रवेशाच्या नावाखाली वाटेल त्याप्रमाणे प्रवेश देण्याची मुभा दिली होती. तर दुसरीकडे मुंबईतील काही अल्पसंख्याक महाविद्यालयांना कोणतीही मागणी नसताना तुकडी वाढ करून त्यांना मोठ्या प्रमाणात जागा भरण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील इतर अनेक महाविद्यालयांमध्ये हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.

मुंबई विभागातील प्रवेश...

  • एकूण जागा - ३,२१,७८०

  • अर्ज केलेले विद्यार्थी - २,५५,१२१

  • प्रवेश घेतलेले विद्यार्थी - २,३४,१८२ (९१.७९ टक्के)

  • अर्ज करूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी - २०,९३९ (८.२१टक्के)

  • रिकामी राहिलेल्या जागा - ८७,५९८ (२७.२२टक्के)

अकरावी ऑनलाईन प्रवेश
जळगाव विभागातून आतापर्यंत ३३२ कर्मचारी निलंबित

अशा झाल्यात प्रवेशाच्या फेरी

फेरी दिलेले प्रवेश - विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश

  • नियमित फेरी १ - ११७८५७ - ५६९८६

  • नियमित फेरी २ - ६००३७ - २०२६४

  • नियमित फेरी- ३ - ३९९६४ - १३१०७

  • स्पेशल फेरी.. ६४८६६ ४६६९५

प्रथम प्राधान्य फेरी (७ टप्पे) ४५९८१ - ३८४१८

  • विशेष प्राधान्य फेरी १ - ३४४८ - ३३०८

  • विशेष प्राधान्य फेरी २ - १२९४ - १२४२

  • विशेष प्राधान्य फेरी ३ - ५९५ - ५३०

कोट्यातील प्रवेश- इनहाउस - ९,३१६ अल्पसंख्याक- ३४,६४९, व्यवस्थापन- १५,८९४, बोर्डनिहाय झालेले प्रवेशएसएससी- २१,३१९६, सीबीएसई -७,१७६, आयसीएसई- १०,७०७, आयबी-१८, आयजीसीएसई -१,३४२, एनआयओएस -५,१८, इतर बोर्ड -१,२२५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com