esakal | शुल्कमाफीसाठी वंचितचा एल्गार; शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण
sakal

बोलून बातमी शोधा

शुल्कमाफीसाठी वंचितचा एल्गार; शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

लॉकडाऊनमुळे सामान्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असताना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा पालकांकडून अवास्तव शुल्क वसूल करत आहेत. हे शुल्क भरणे सामान्यांना शक्‍य नसल्याने राज्य सरकारने या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

शुल्कमाफीसाठी वंचितचा एल्गार; शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

sakal_logo
By
तेजस वाघमारे


मुंबई : लॉकडाऊनमुळे सामान्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असताना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा पालकांकडून अवास्तव शुल्क वसूल करत आहेत. हे शुल्क भरणे सामान्यांना शक्‍य नसल्याने राज्य सरकारने या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण दिनानिमित्त सकाळी धारावीतील 90 फूट रोडवर मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 

स्टंटबाजी जीवावर बेतली, सुर्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी धारावी तालुक्‍याच्या वतीने गेल्या महिन्यात शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. यानंतरही शिक्षण विभागाने याप्रकरणी निर्णय न घेतल्याने पक्षाने शिक्षक दिनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सकाळी 8 वाजता मनिहार इकबाल हुसेन, विनोद जैसवार, नवीन मुगेश, सुनील कांबळे, सुषमा सोहनी आदी पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत. हे लोन लवकरच राज्यभरात पोहचून जनता सरकारला शुल्क माफ करण्यासाठी भाग पडेल, असे वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले.

दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

घरात दोन मुले शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी मोबाईल खरेदी करावा लागत आहे. तसेच मोबाईल डेटावर खर्च करावा लागत आहे. कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाऐवजी ऑनलाईन शिक्षणावर पालकांचा खर्च वाढला आहे. यातच शाळा शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत. तरीही शिक्षणमंत्री पालकांना दिलासा देत नसल्याने हे उपोषण करण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. 
-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )