esakal | आरोपी वर्वरा राव यांची जामीनाचा अवधी वाढवण्यासाठी हायकोर्टात धाव
sakal

बोलून बातमी शोधा

varvara rao

आरोपी वर्वरा राव यांची जामीनाचा अवधी वाढवण्यासाठी हायकोर्टात धाव

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : एल्गार परिषद (elgar parishad) प्रकरणातील जामीनावर असलेले आरोपी कवी पी. व्ही वर्वरा राव (84) यांनी जामीनाचा अवधी वाढविण्यासाठी (Bail Tenure) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) अर्ज (application) केला आहे. तसेच त्यांना त्यांच्या मूळ गावी (native place) परत जाण्याची परवानगी (permission) द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा: गळा आवळून चेहरा जाळलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा; पतीला ठोकल्या बेड्या

राव यांना वैद्यकीय कारणांमुळे उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने घातलेल्या शर्तीनुसार राव यांना मुंबईमध्ये रहावे लागत आहे. सध्या ते पत्नीसह मुंबई त राहतात. पण मुंबईमध्ये राहणे कठीण आणि परवडणारे नाही, त्यामुळे मला माझ्या मूळ गावी तेलंगणामध्ये जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन मी करत असून अद्याप माझी प्रक्रुती खालावलेली आहे, असेही त्यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.

न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये त्यांना सहा महिन्याचा जामीन मंजूर केला आहे. माणुसकीच्या भावनेतून आणि वय आणि आजारांचा विचार करून जामीन मंजूर करत आहोत, मात्र राव यांनी एन आय एच्या क्षेत्राबाहेर जाऊ नये, अशी अट खंडपीठाने लावली आहे. सोमवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे. एल्गार परिषदमधील पंधरा आरोपींपैकी केवळ राव यांनाच जामीन मंजूर झाला आहे. एनआयए लवकरच न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहे.

loading image
go to top