वाडीचे सौंदर्य खुलवावे ते असे

महाड : भिंती रंगवताना सुदर्शन केमिकल कंपनीचे कर्मचारी.
महाड : भिंती रंगवताना सुदर्शन केमिकल कंपनीचे कर्मचारी.
Updated on

महाड (बातमीदार) : महाड औद्योगिक क्षेत्रांमधील सुदर्शन केमिकल या कंपनीच्या सुधा सीएसआरच्या सामाजिक बांधिलकी विभागामार्फत ‘स्वच्छ आदिवासीवाडी, सुंदर आदिवासीवाडी’ हा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुदर्शन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ५८ घरांच्या भिंतींवर सुविचार व चित्रे काढून वाडीच्या सौंदर्यात भर घातली. 

महाड औद्योगिक क्षेत्रांमध्ये असणारी सुदर्शन केमिकल कंपनी गेले अनेक वर्षे या भागांमध्ये आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. सुदर्शन कंपनीने शेल आदिवासीवाडी येथील मूलनिवासी विकास समिती आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने अनेक विकासकामे हाती घेतली आहेत.

म्‍हाडाच्‍या घराचे स्‍वप्‍न साकार होणार... स्वप्‍नाच्‍या घरासाठी काय करावे लागणार ते वाचा

यामध्ये २२ ग्रामस्थांना गवंडी कामाचे प्रशिक्षण, १४ कुटुंबांना शेळीपालन, ५५ कुटुंबांना निर्धूर चुली, सौरऊर्जावर आधारित पिण्याच्या पाण्याची योजना, अंगणवाडी, माता व बाल विकास प्रकल्प, मासे पालन प्रशिक्षण आणि मत्स्य जाळ्यांचे वाटप, कचरामुक्तीसाठी ५८ घरांना गांडूळखत निर्मितीसाठी संपूर्ण प्रकल्प आणि वाडीमध्ये सौरऊर्जा दिवाबत्तीची सोय केली आहे. यापुढे जात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही यामध्ये खारीचा वाटा म्हणून आदिवासीवाडीतील ग्रामस्थांना कपड्यांचे वाटप आणि घरगुती वस्तूंचे वाटप केले. 

संपूर्ण वाडी सुंदर राहावी यासाठी ५५ कर्मचाऱ्यांनी भिंतींवर रंगकाम केले. सुंदर चित्रे काढली आणि आकर्षक असे सुविचार लिहिले. कर्मचाऱ्यांनी कंपनीतील आपले काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वाचे काम या वेळी केले. 

या वेळी कंपनीचे महाव्यवस्थापक सुधीर लोखंडे, सीएसआर व्यवस्थापिका माधुरी सणस, मोहन चव्हाण, वैशाली मुळे, रूपेश मारबते, अमित भुसारे, विकी फळे व ऋषिकेश जोशी उपस्थित होते.

स्वच्छवाडी सुंदरवाडी मोहिमेंतर्गत कर्मचाऱ्यांनी दिलेले बहुमोल योगदान उत्साह निर्माण करणारे आहे. आदिवासींना त्‍यांनी जगण्याचे साधन तर दिलेच; पण घर व परिसर सुशोभित केल्याने वाडीत एक नवचैतन्य आल्यासारखे वाटत आहे. या कामामुळे आम्हा सर्वांना वेगळाच आनंद मिळाला.
- सुधीर लोखंडे, महाव्यवस्थापक सुदर्शन केमिकल

दिलेला आधार
*   २२ ग्रामस्थांना गवंडी कामाचे प्रशिक्षण
*   १४ कुटुंबांना शेळीपालन
*   ५५ कुटुंबांना निर्धूर चुली
*   ५८ घरांना गांडूळखत निर्मितीसाठी संपूर्ण प्रकल्प 
*   वाडीमध्ये सौरऊर्जावर दिवाबत्तीची सोय, पिण्याच्या पाण्याची योजना
*   मासे पालन प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com