महामुंबईचा घसा कोरडाच! जुलै अखेरीस धरणांमध्ये निम्म्या पाणीसाठ्याचीही नोंद नाही...

महामुंबईचा घसा कोरडाच! जुलै अखेरीस धरणांमध्ये निम्म्या पाणीसाठ्याचीही नोंद नाही...

मुंबई : मुंबईसह महामुंबईत आठवडा भरापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असून पुढील गुरुवारपर्यंत हीच परिस्थिती राहाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने निम्माच पाऊस झाला आहे.

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी साडे चौदा लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते.तर, तलावांमध्ये रविवार सकाळ पर्यंत 4 लाख 56 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.तर,गेल्या वर्षी आजच्या दिवसा पर्यंत 9 लाख 28 हजार आणि 2018 मध्ये 11 लाख 98 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढिल गुरुवार(ता.30) पर्यंत मुंबई,ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावात आता पर्यंत 748 मिमी पाऊस झाला असून गेल्या वर्षी 1379 मिमी, ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर मध्ये 734.00 मिमी,तानसा मध्ये 719 मिमी मध्य वैतरणा मध्ये 930 मिमी पाऊस झाला आहे.

तर गेल्या वर्षी मोडकसागर 1826.00 मिमी,तानसा 1586 मिमी ‌, मोडकसागर 1479 मिमी पावसाची नोंद होती.तर सर्वात मोठ्या भातसा तलावाच्या परीसरात 1060मिमी पाऊस झाला असून गेल्या वर्षी 1744 मिमी पाऊस झाला आहे. जूलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून मुंबई,ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज होता. मात्र,जुलै महिन्याचे अखेरचे दिवसही कोरडे जाणार आहेत.

तलावातील पाणी पातळी (मिटर) आणि साठा ( दशलक्ष लिटर)

तलाव पुर्ण भरल्यावर आजची पातळी साठा 
अप्पर वैतरणा 603.51 597.02 3809
मोडकसागर 163.15 152.34 48910
तानसा 128.63 121.88 35713
मध्य वैतरणा 285.00 258.39 61273
भातसा 142.07 121.35 247055
विहार 80-12 87.06 17137
तुळशी 139.17 139.12 7987

तापमान 33 अंशा पर्यंत पोहचणार 

कुलाबा येथे आज 2.2 मिमी पाऊस नोंदविण्यात आला असून कमाल 31 आणि किमान 25.5 अंश तापमानाची नोंदविण्यात.तर सांताक्रुझ येथे 9.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर कमाल 32.0 आणि किमान 25.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.पुढील 48 तास आकाश निरर्भ राहाणार असून कमाल तापमान 33 अंशा पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.

----------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com