महिन्याच्या अखेरपर्यंत घामाच्याच धारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

मुंबई : पावसाने दिलेली ओढ आणि आर्द्रतेत झालेली वाढ यामुळे तापमान वाढत असून, रविवारपर्यंत (ता. 1) अशीच परिस्थिती राहण्याची शक्‍यता आहे. महामुंबईसह संपूर्ण कोकणात 1 सप्टेंबरपर्यंत तुरळक सरी कोसळण्याची शक्‍यता असल्याने तोपर्यंत घामाच्याच धारा वाहणार आहेत. 

पावसाळ्यात मुंबईत कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत असते. पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या तापमानात सरासरी 2 ते 3 अंशांनी वाढ होत आहे. बुधवारी सांताक्रूझ येथे 32.1 अंश कमाल आणि 25 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, आर्द्रता 86 टक्के नोंदवण्यात आली. मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण 50 ते 60 टक्के असल्यास उकाडा जाणवत नाही. सध्या हवेतील आर्द्रता 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 

आठवडाभराहून जास्त काळात महामुंबईत चांगला पाऊसही झालेला नाही. महामुंबईत तापमान वाढत असून, 1 सप्टेंबरपर्यंत तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. मुंबईत पुढील 48 तासांत तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

बुधवारची स्थिती 
ठिकाण कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पाऊस (मिमी) 
सांताक्रूझ 32.1 6 
अलिबाग 31.4 2.8 
ठाणे 31 8 
डहाणू 30.4 2.1 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By the end of the month only the sweat stream