BMC: पैसे घेऊन अभियंत्यांची बढती केली, काँग्रेसचा आरोप

BMC
BMCsakal media

मुंबई : महानगरपालिकेच्या (BMC) 132 अभियंत्यांना बढती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला आहे. मात्र,पैसे घेऊन(Money) ही बढती झाली असल्याचा आरोप कॉंग्रेसने(Congress) केला आहे. कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. शिवसेनेने (Shivsena) हे आरोप फेटाळले आहेत. ( Engineer promotion scam allegation of congress to shivsena-nss91)

महानगर पालिकेच्या 132 अभियंत्यांना बढती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत गरुवारी मंजूर झाला.हे सर्व अभियंते पदवीका प्राप्त आहेत.मात्र,अभियंात्रिकीची पदवी असलेल्या 102 अभियंत्यांना या बढतीत डावलण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.महापालिकेची सोमवारी महासभा होणार आहे.त्यावेळी हा प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे.त्यावेळी याबाबत भुमिका मांडू असेही रवी राजा यांनी सांगितले.

BMC
बोगस फिजिओथेरपी डॉक्टर, संस्थांवर 'या' परिषदेचा कारवाईचा बडगा

स्थापत्य समितीच्या ऑनलाईन कामकाजाची लिंक विलंबाने मिळाली.त्यामुळे कॉंग्रेसचे सदस्य सुफियाणू वणू जेव्हा या बैठकीत सहभागी झाले तेव्हा बैठकीचा शेवट होत होता.जाणून बुजून विलंबाने लिंक देण्यात आली असा आरोपही करण्यात आला.कॉंग्रेसने कामकाज संपल्यानंतर या प्रस्तावावर आक्षेप घेतला.नियमानुसार बैठकीची लिंक योग्य वेळेत पाठविण्यात आली होती.यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.नियमानुसार हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.असे स्थापत्य समिती शहरचे अध्यक्ष दत्ता फोंगडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com