राज्यात पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा! टंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

राज्यात पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा! टंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

मुंबई : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 
महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत.

कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्‍टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्‍यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी सरकारस्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत; परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या-छोट्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. 

सद्यस्थितीतील साठा 
- राज्यातील 344 रक्तपेढ्यांमध्ये 19 हजार 059 रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या 2 हजार 583 युनिट 
- मुंबईतील 58 रक्तपेढ्यांमध्ये 3 हजार 239 रक्ताच्या युनिट आणि 611 प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्‍यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करून रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोना काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे. 
- उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री. 

enough blood only for five to seven days in the state Chief Ministers appeal to the people
-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com