लवकरच मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळणार; प्रस्ताव सादर करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

संतोष भिंगार्डे
Friday, 27 November 2020

राज्यामध्ये हिंदीबरोबरच अनेक प्रादेशिक भाषांतील चित्रपट तसेच जाहिराती, माहितीपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे.

मुंबई : राज्यामध्ये हिंदीबरोबरच अनेक प्रादेशिक भाषांतील चित्रपट तसेच जाहिराती, माहितीपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मनोरंजन क्षेत्राबाबत धोरण असणे ही काळाची गरज आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार काम करीत आहेत. तसेच या क्षेत्रामुळे अनेक रोजगार निर्माण होत आहेत. हे विचारात घेऊन या क्षेत्रासाठी निश्‍चित धोरण आणि या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे आदेश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले आहेत. 

हेही वाचा - विना मास्क प्रवाशांवर कारवाई; लोहमार्ग पोलिसांची धडक मोहीम

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.27) पार पडली. राज्याच्या अर्थव्यवस्थेत मनोरंजन क्षेत्रातून मोठी भर पडत असून, यामध्ये आणखी वाढ होण्यास वाव आहे. यासाठीच येणाऱ्या काळात चित्रपट निर्मात्यांना मुंबईबरोबरच राज्यातील इतर चित्रिकरण स्थळांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महामंडळामार्फत तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये चर्चिले गेलेल्या बाबींचाही मनोरंजन क्षेत्रासाठीचे सर्वंकष धोरण ठरविताना समावेश करण्यात यावा. असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. 

 

महामंडळाने गेल्या 15 वर्षाची लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असून, अनेक सार्वजनिक उपक्रमांपैकी नफ्यात असलेल्या काही मोजक्‍या महामंडळापैकी चित्रनगरी हे एक महामंडळ आहे. यापुढील काळातदेखील ही परंपरा अशीच सुरु राहील. येणाऱ्या काळात महामंडळ केवळ आर्थिक पातळीवरच नाही तर धोरणात्मक पातळीवरही महत्वाची कामगिरी करेल. 
- अमित देशमुख,
सांस्कृतिक कार्यमंत्री. 

The entertainment sector will soon gain industry status 

---------------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The entertainment sector will soon gain industry status