पर्यावरणीय घटक ठरतायेत आरोग्यासंबंधीत समस्यांना कारणीभूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Environmental factors can cause health problems

पर्यावरणीय घटक ठरतायेत आरोग्यासंबंधीत समस्यांना कारणीभूत

मुंबई: प्रदूषण, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोन थर कमी होणे यासारख्या पर्यावरणीय घटकांचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. प्रदूषण आणि हवामान बदलामुळे मोठ्या संख्येने लोकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची काळाची गरज आहे. जागतिक आरोग्य दिनाचा यावर्षीची संकल्पना आहे आपले ग्रह, आपले आरोग्य. या प्रसंगी, आपले आरोग्य चांगले आणि सुरक्षित राहण्यासाठी आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे.

झेन मल्टीस्पेशालिटी जनरल फिजिशियन आणि संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. विक्रांत शहा म्हणाले की, रूग्णालयाचे आपले आरोग्य हे थेट पर्यावरणाशी निगडित आहे. स्वच्छ शहर आणि हिरवेगार वातावरण हे निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या मते, हवामान बदलामुळे 2030 आणि 2050 मध्ये कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि वाढत्या उष्णतेमुळे दरवर्षी अंदाजे 250,000 अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. पर्यावरणीय संकट संपुर्ण जग अनुभवत आहे. हवामान आणि संबंधीत पर्यावरणीय आपत्तींमुळे जगाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, टायफून आणि चक्रीवादळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गीक विनाश घडवून आणतात आणि निष्पाप लोकांचा जीव घेतात. उष्ण तापमानामुळे ओझोनचे प्रमाण वाढते ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्यामुळे एखाद्याच्या फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते आणि दम्याचे रुग्ण आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे म्हणाले की, पर्यावरणातील घटकांचा तुमच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. विविध रोगांमागील पर्यावरणीय जोखीम घटक म्हणजे प्रदूषण, हवेतील सूक्ष्मजंतू, पाणी किंवा अन्नातील मातीचे दूषित घटक, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, नैसर्गिक आपत्ती (चक्रीवादळ, भूकंप, पूर), आणि कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर या घटकांचा परिणाम आरोग्यावर होतो. वायू प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती, सूक्ष्मजंतूंमुळे होणारे रोग आणि पाण्याची गुणवत्ता ही घातक आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते. पर्यावरणीय प्रदूषक आणि औद्योगिक कचरा यामुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), ब्राँकायटिस, हृदयरोग (अनियमित हृदयाचे ठोके, हृदय अपयश), नैराश्य, स्ट्रोक, घरघर, खोकला आणि दम लागणे यासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात. अलिकडच्या वर्षांत प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्याही वाढतात. असुरक्षित पिण्याचे पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसार, कॉलरा, मेंदुज्वर आणि जठराला सूज येते.

Web Title: Environmental Factors Can Cause Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..