चढता जिना एकाएकी उलटा फिरला आणि लोकांच्या काळजात धस्स झालं... 

चढता जिना एकाएकी उलटा फिरला आणि लोकांच्या काळजात धस्स झालं... 

मुंबई : मुंबईत कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. सोमवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी अंधेरी स्थानकावर अचानक एस्केलेटर म्हणजेच सरकता जिना उलट्या दिशेनी जाऊ लागला. यावेळी जिना प्रवाशांनी भरला खच्चून भरला होता. वर जाणारा जिना अचानक खाली जाऊ लागल्यामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडला नाही.

मुंबईतील पश्चिम रेल्वेवर असलेल्या अंधेरी स्थानकावर कायम प्रवाशांची गर्दी असते. त्यातच प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर दादरकडील दिशेला असलेला सरकता जिना अचानक उलटा फिरु लागला. यामुळे वर जाणारे प्रवासी एकाएकी खाली येऊ लागले. यात काही प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले. २ ते ३ जण यामध्ये किरकोळ जखमी झाले आहे. यातच काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखून एस्केलेटरचे स्टॉप बटन दाबले आणि मोठा अनर्थ टळला.

विशेष म्हणजे  एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची दुर्घटना अजूनही ताजी आहे. या दुर्घटनेमद्धे अनेकांनी आपले प्राण गमावले होते. मात्र या प्रकरणातून रेल्वे प्रशासनाने काहीच बोध घेतल्याचं दिसत नाहीये. अशा प्रकारच्या घटना मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. मात्र रेल्वे प्रशासननं प्रवाशांच्या संरक्षणासाठी पावलं उचलायला हवीत.

काय असू शकतं कारण:

ज्या वेळी हा सगळा प्रकार अंधेरी स्टेशनवर घडला त्यावेळी प्रवाशांची प्रचंड गर्दी या एस्केलेटरवरुन वर चढत होते. हे एस्केलेटर संपूर्णपणे स्वयंचलित असतं आणि इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने चालत असतं. जिन्यावर वजन जास्त झाल्यामुळे मोटरवर अतिरिक्त भार आला आणि त्यामुळे मोटर अचानकपणे उलट्या दिशेने फिरू लागल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घटना तांत्रिक बिघाडामूळे ही घटना घडल्याचं दिसून येतंय.    

escalators on andheri station goes in opposite direction creates chaos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com