तब्बल तीन वर्षांनी मुंबई महानगर पालिकेची जैवविविधता समिती स्थापन

तब्बल तीन वर्षांनी मुंबई महानगर पालिकेची जैवविविधता समिती स्थापन

मुंबई : मुंबई महानगर पालिकेची जैवविविधता समिती तब्बल तीन वर्षांनी स्थापन झाली आहे.ही समिती शहरातील जैवविविधतेची नोंदी ठेवणार असून त्यांच्या जतनासाठी संवर्धनासाठी महत्वाची भुमिका बजावणार आहे.मार्च महिन्यात हरित लवादाने ही समिती स्थापन होत नसल्याबद्दल पालिकेला मासिक 10 लाख रुपयामचा दंड थोटावला होता. जैव विविधता कायदा 2002 नुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना जैव विविधता समिती स्थापन करायची होती.मात्र,एकाही शहरात ही समिती स्थापन न झाल्याबद्दल काही वर्षांपुर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्याा औरंगाबाद खंडपिठाने समिती स्थापन करण्यााााचे आदेश दिले होते.त्यानुसार पालिकेने 2017 मध्ये प्रक्रीया सुरु केली.मात्र,प्रत्यक्ष समिती सदस्यांची नियुक्ती रखडली होती.मार्च महिन्यात हरित लवादाने दंड थोटावल्यानंतर नियुक्तीची प्रक्रीया पुर्ण केली.डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला महासभेच्या    विशेष बैठकीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी या सदस्य नियुक्तीवर शिक्का मोर्तब केले.ही समिती स्थापन करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

समिती स्थापन करण्याची प्रक्रीया पुर्वीच झाली होती.मात्र,कोविड मुळे बैठक होऊ शकली नाही.या समितीच्या वर्षातून चार बैठका होणे बंधनकारक आहे.23 सदस्यांची ही समिती असून पाच तज्ञ,
सात नगरसेवक,आठ पालिका प्रशासनाचे प्रतिनिधी, प्रत्येकी एक आमदार,खासदार सदस्य असतील.पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अथवा उद्यान विभागाचे सहआयुक्त किवा उपायुक्त अध्यक्ष असून उद्यान अधिक्षक  सदस्य सचिव असतील.

समितीचे काम काय

ही समिती शहरातील जैव विविधतेच्या नोंदी तयार करेल.या जैवविवधतेचे औषधी तसेच पारंपारीक महत्व याच्याही नोंदी असतील.या नोंदीचा उपयोग जैवविविधतेच्या संवर्धनासाठी करता येईल.

हे तज्ञ 

कृषीतज्ञ सुहास पाटणे,मस्त्यतज्ञ डॉ.दिपक आपटे, पशुधन तज्ञ मयुर कामत,शिक्षण क्षेत्र पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर, जितेंद्र रामगावकर वनतज्ञ. रामगावकर हे ताडोबा अंधेरी वाघ्रप्रकल्पाचे फिल्ड डायरेक्टर आहे.

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com