
मुंबई - राज्यातील जनतेला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रणाली काय असावी याबाबत टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हीसी मध्ये दिली.
हेही वाचा - कंगनाचं ऑफिस उद्धवस्त करताना कोठे होती मर्दानगी? दरेकरांचं राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर
कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत . महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, हिंमत असेल तर घरी या: संजय राऊत
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते .
Establishment of Task Force on Corona Vaccination in the State Information of Chief Minister Uddhav Thackeray to the Prime Minister
-----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )