युरोपयीन कंपनीनं नायर हॉस्पिटलला दिली 'ही' अनोखी भेट, वाचा सविस्तर

युरोपयीन कंपनीनं नायर हॉस्पिटलला दिली 'ही' अनोखी भेट, वाचा सविस्तर

मुंबई:  युरोपमधील लस साठविण्यासाठी कोल्ड चेन उपकरण तयार करणारी तसेच  जागतिक क्रमवारीत अग्रेसर असलेल्या बी मेडिकल सिस्टम्सने शुक्रवारी  अत्याधुनिक कोल्ड चेन सिस्टम उपकरण मोफत देऊन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला अजून बळकटी दिली आहे. 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका या कंपनीने  बनविलेल्या कोरोना लसीची  पॅन-इंडिया क्लिनिकल चाचण्या घेण्यास  मुंबईतील नायर हॉस्पिटलला परवानगी दिली आहे.

कोव्हीड 19 च्या लसीकरणासाठी विविध चाचण्या नायर चॅरिटेबल हॉस्पिटमध्ये केल्या जाणार आहेत व  चाचण्यांचे नमुने व लस साठवून ठेवण्यासाठी  अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजची गरज लागणार आहे. कारण लस शोधण्याच्या व वापरण्याच्या प्रक्रियेत त्याचे तापमान हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांच्या संचयनास सतत रेफ्रिजरेशन आवश्यक असते, जर बनविलेल्या लशींची साठवण तापमानाच्या श्रेणीबाहेर ठेवली गेली तर ती लस  कुचकामी आणि असुरक्षित ठरू शकते हा  धोका टाळण्यासाठी जगातील अग्रगण्य कोल्ड चेन उपकरण बनविणाऱ्या बी- मेडिकल सिस्टमने  मुंबईला मदतीचा हात देऊ केला आहे.  शुक्रवारी नायर हॉस्पिटलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हे आधुनिक उपकरण हॉस्पिटलच्या ताब्यात देण्यात आले. 


यावेळी बोलताना बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटलचे  संचालक (एमई आणि एमएच) आणि डीन डॉ. रमेश एन. भारमाल, म्हणाले, “ बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटल कोरोनाव्हायरसच्या लढाईत प्रमुख भूमिका बजावत आहे आणि या लढाईमध्ये  लस साठवून ठेवण्यासाठी जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रणा आमच्यासोबत आल्यामुळे  आम्ही नक्कीच कोरोनावर विजय मिळवू, एप्रिल 2020 पासून आमचे हॉस्पिटल मुंबईतील सर्वात मोठे  कोविड -19 सुविधा केंद्र बनले असून  आम्ही  हजारो रूग्णांवर  यशस्वी उपचार केले आहेत.  कोरोना लसीकरणाच्या चाचण्या करण्यासाठी व  लसीकरणाच्या साठवणुकीशी संबंधित ताण या उपकरणामुळे कमी झाला आहे." 


या उपक्रमाबद्दल बोलताना बी मेडिकल सिस्टम्सचे डेप्युटी सीईओ श्री. जेसल दोशी म्हणाले, “बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटलला सहकार्य करताना तसेच वैद्यकीय लस साठवून ठेवण्यासाठी  उच्च दर्जाचे उपकरण  मुंबईकरांच्या सुविधेसाठी  देताना आम्हाला आनंद होत  आहे. कोरोना लसीचे  तापमान संवेदनशील असल्याने त्यांच्या संचयनास सतत रेफ्रिजरेशन आवश्यक असते.  जर लसीची  साठवण तापमानाच्या श्रेणीबाहेर संग्रहित केली तर ती तर लस त्यांची क्षमता गमावते  आणि संभाव्यतः कुचकामी आणि असुरक्षित लसींचा परिणाम होण्याचा धोका टाळण्यासाठी  बृहन्मुंबई महानगरपालिकेला ही मदत केली असून ही संपूर्ण यंत्रणा आम्ही त्यांना मोफत उपलब्ध करून दिली आहे." 


बी मेडिकल सिस्टम ही  पश्चिम युरोपातील लक्झेंबर्ग या देशातील असून गेली चार दशके ही  कंपनी जगभरातील लशींची  साठवण आणि वाहतुकीसाठी नवीन उपाय शोधत आहे आणि जगभरातील जागतिक मानवतावादी आणि खरेदी संस्थांची विश्वासू भागीदार आहे.  बी मेडिकलची सर्व लस कोल्ड साखळी युनिट ईयू आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या पीक्यूएस प्रमाण पत्राची कठोर गुणवत्ता मानके पूर्ण करतात. या कंपनीतील सर्व कोल्ड चेन युनिट पेटंट सुरक्षित आहेत आणि संपूर्ण वर्षभर आर्द्रता असलेल्या मुंबईसारख्या शहरात या  अत्याधुनिक उपकरणाची खास गरज आहे.

-------------

(संपादनः पूजा विचारे)

European company donates equipment Nair Hospital corona vaccine storage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com