निवडणूक काळात मद्य तस्करी रोखण्यासाठी चोख बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

तलासरी : विधानसभा निवडणूक काळात मद्य तस्करी होऊ नये, यासाठी केंद्रशासित प्रदेश आणि पालघर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

तलासरी : विधानसभा निवडणूक काळात मद्य तस्करी होऊ नये, यासाठी केंद्रशासित प्रदेश आणि पालघर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सीमातपासणी नाके, टोल मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कैलास शिंदे यांनी तलासरी येथे दिली.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या पार्श्‍वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी; तसेच पालघरच्या सीमेवरील केंद्रशासित प्रदेश आणि गुजरात राज्यातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तलासरी येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते.

बैठकीत निवडणूक काळात सीमाभागातून होणारी मद्य तस्करी, मोका व तडीपार केलेले आरोपी; तसेच सीमाभागातील तपासणी नाके, आरटीओ टोल आदींची माहिती घेऊन त्यावर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंग, सहायक कोकण डिव्हिजन सुनील चव्हाण, एसडीएम दमण चर्मी पारेख, आरडीसी खानवेल नीलेश गुरव, एसडीपीओ व्ही. एम. जडेजा, पालघरचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन, डीव्हायडीओ के. आर. पटेल, डहाणू आरओ सौरभ कटीयार, वसईचे उपअधीक्षक गोंधरवाड बालाजी, डहाणू एसडीपीओ एम. वी. धर्माधिकारी आदी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Evaluate measures to prevent alcohol trafficking during the election period In Palghar