esakal | Eleventh Admission: राज्य शिक्षण मंडळाने दिली 'ही' महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

School Admission

Eleventh Admission: राज्य शिक्षण मंडळाने दिली 'ही' महत्वाची माहिती

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या ( State Education Board) दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर झाल्यामुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. यंदा अकरावीचे प्रवेश हे सीईटीच्या (CET) माध्यमातून केले जाणार असल्याने यासाठीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी दिली. तर दुसरीकडे दहावीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असले तरी मागील वर्षी हजारो जागा रिक्त होत्या त्यामुळे यंदा प्रत्येक विद्यार्थ्याना अकरावीत प्रवेश मिळणार (Eleventh Admission) असल्याचेही सांगण्यात आले. ( Every Student Will Get Admission in eleventh class says education board-nss91)

हेही वाचा: SSC RESULT : मुंबईसह ५ शिक्षण मंडळाचा निकाल, जाणून घ्या सविस्तर

मुंबईसह राज्यातील पुणे, पिंपरीचिंचवड, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आदी महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात, तर उर्वरित ठिकाणी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया केली जाते. यंदा दहावीच्या निकालात प्रचंड मोठ्याप्रमाणात गुणवाढ झालेली असली तरी विद्यार्थ्यांना सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे अधिकचे गुण मिळालेल्या शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सीईटीमुळे नियंत्रण येणार आहे. तर सीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. मुंबई महानगरक्षेत्रात मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी ८४३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल ३ लाख २० हजार ७८० जागा ऑनलाईन प्रवेशासाठी उपलब्ध होत्या, यापैकी २ लाख २४ हजार ६९५ जागांवर प्रवेश झाले असून उर्वरित ९६ हजार ८५ जागा या रिक्त राहिल्या होत्या यामध्ये कला आणि वाणिज्य शाखेच्या जागांचा सर्वाधिक समावेश होता.

मुंबईत मागील वर्षी अशा होत्या जागा

शाखा एकुण जागा झालेले प्रवेश रिक्त जागा

कला 37310 22245 15065

वाणिज्य 173900 131058 42842

विज्ञान 103910 68290 35620

एचएसव्हीसी 5660 3102 2558

एकुण 320780 224695 96085

loading image