मुंबईचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल म्हणतायत कोरोना रोखण्यासाठी 'हा' निर्णय घ्यायलाच हवा...

BMC authorities
BMC authorities

मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज दिवसभरात मुंबईत कोरोनाचे तब्बल ९९८ रुग्ण सापडले आहेत. त्यात धारावीतही कोरोना रुग्णांचा आकडा १००० च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी प्रत्येक विभागात १०० खाटांचं रुग्णालय असलं पाहिजे. असं मत मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केलंय.

जयस्वाल यांनी आज वरळी पासून धारावी, शिव पर्यंतच्या परीस्थीतीचा आढावा घेतला.विलगीकरण आणि अलगीकरण केंद्रात नागरीकांना दर्जेदार सुविधा मिळतील तसेच परीसरही स्वच्छ राहील याकडे लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी सहाय्यक आयुक्तांना केल्या. तसेच कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आललेल्याचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्यात यावे अशा सुचनाही त्यांनी केल्या.जयस्वाल यांनी अलगीकरण केंद्रांना भेट देऊन तेथील नागरीकांशीही संवाद साधला.

यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत उपायुक्त नरेंद्र बरडे,सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर,शरद उघडे,गजानन बेल्हाळे, स्वप्नजा क्षीरसागर उपस्थीत होते. 

मुंबईत सध्या  खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयात कोविडच्या रुग्णांसाठी ३ हजार ६९० खाटा तयार आहेत. त्यात मुंबई सेंट्रल येथील  नायर रुग्णालयात ५०० आणि मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ७५० हून अधिक खाटा तयार आहेत. ही दोन्ही रुग्णालयं कोविड स्पेशल रुग्णालये आहेत. तर, लक्षण नसलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. तेथे ३५ हजार ००९ खाटा तयार आहेत. 

मात्र तरीही प्रत्येक विभागाचं स्वतंत्र १०० खाटांचं रुग्णालय असावं असं मत अतिरिक्त आयुक्तांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. 

every zone of city should have its own 100 bed hospital for corona treatment said mumbai additional commisioner sanjiv jaiswal read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com