esakal | राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

राज्याच्या माजी मुख्य निव़डणूक आयुक्त आणि सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचं कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले आहे.

राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - शहरात कोरोनाचा जोर कमी होताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबई आणि राज्यासाठी दुःखद बातमी समोर आली आहे. राज्याच्या माजी मुख्य निव़डणूक आयुक्त आणि सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचं कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले आहे. नीला यांच्या कुटूंबालाही कोरोनाची लागण झाल्याने ते सर्व रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नीला यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

मोठी बातमी : राज्यातील केवळ 'इतकेच' विद्यार्थीच ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत; युनिसेफ आणि एससीईआरटीचे सर्वेक्षण

नीला सत्यनारायण 1972 आयएएस बॅचच्या अधिकारी होत्या. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कारभार पाहिला होता. नीला यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांची लोकप्रियता मोठी होती. प्रशासनावर त्यांची पकड होती. त्यांनी गृह, महसूल, वन, ग्रामीण विकास इत्यादी विभागांमध्ये आपल्या प्रशासनीक कामाचा ठसा उमटवला होता.

 वाचा - डॉक्टर डॉन मालिकेने कोव्हिड विरुद्धच्या लढ्यात दिले मोठे योगदान; वाचा सविस्तर...

नीला प्रशासकासोबतच उत्तम लेखिकासुद्धा होत्या. सनदी अधिकारी असूनही त्या आपल्या लिखानातून नेहमी व्यक्त होत असत. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधून पुस्तके लिहली. 150 पेक्षा जास्त कविता नीला यांनी लिहल्या आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी तसेच 2 हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्ददर्शन केले आहे. त्यामुळे त्यांना संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले होते.

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image