Sudhir More Death Case : शिवसेनेचे नेते सुधीर मोरेंच्या आत्महत्या प्रकरणी माजी आमदाराच्या मुलीवर गुन्हा

Ex Shiv sena UBT Corporator Sudhir More suicide case filed against daughter of former Shivsena MLA
Ex Shiv sena UBT Corporator Sudhir More suicide case filed against daughter of former Shivsena MLA
Updated on

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नते माजी नगरसेवक सुधीर मोरे यांच्या आत्महत्येने मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मोरे यांनी मुंबईतील घाटकोपर स्टेशन जवळ ट्रेन समोर उडी घेऊन कथितरित्या आत्महत्या केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

दरम्यान या प्रकरणात आता शिवसेनेचे माजी आमदार शांताराम चव्हाण यांच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलिमा चव्हण आणि सुधीर मोरे यांच्या शेवटचा संवाद झाला होता. यासंबंधीचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

विक्रोळी (पश्चिम) येथे राहणारे शिवसेना (उद्धव गट) नेते सुधीर सयाजी मोरे यांचा मृतदेह विद्याविहार-घाटकोपर दरम्यान रेल्वे रुळावर आढळल्याने खळबळ उडाली होती. यानंतर मोरे यांना आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त केले? असा प्रश्न विचारला जात होता.

Ex Shiv sena UBT Corporator Sudhir More suicide case filed against daughter of former Shivsena MLA
Jalna Lathi Charge : 'गोवारी हत्याकांड घडलं तेव्हा...'; फडणवीसांची शरद पवारांच्या जालाना दौऱ्यावर टीका

दरम्यान एक महिला मोरे यांना दोन महिन्यांपासून ब्लॅकमेल करत होती. दरम्यान गुरुवारी रात्री अकरा वाजता मोरे हे बॉडीगार्डविना घरातून खासगी बैठक असल्याचे सांगून निघून गेले. त्यानंतर त्यांचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

मोरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला विक्रोळी पार्क जागेवरून सुरुवात केली. 2002 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. विजयानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नंतर पार्क साइट वॉर्ड क्रमांक 123 ही आरक्षित जागा झाल्यावर कुणबी समाजाचे काशिनाथ थरली यांना रिंगणात उतरवले. महिलांची जागा उपलब्ध झाल्यावर मोरे यांनी डॉ. भारती बावधने यांना तिकीट मिळवून देऊन त्यांचा विजय निश्चित केला. शिवसेना फुटल्यानंतरही ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले.

Ex Shiv sena UBT Corporator Sudhir More suicide case filed against daughter of former Shivsena MLA
Jalna Maratha Andolan : "इथे सरकारचं चुकलं हे निश्चित"; राज ठाकरेंची जालन्यातील लाठीमार प्रकरणावर सडेतोड प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com