लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेची शानदार कामगिरी; 35.53 दशलक्ष टन मालाची केली वाहतूक

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेची शानदार कामगिरी; 35.53 दशलक्ष टन मालाची केली वाहतूक

मुंबई : कोरोनामुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने मध्य रेल्वेने 23 मार्च ते 18 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीत 6.72 लाख वाघिणीद्वारे 35.53 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. 

ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवर वस्तू व मालपुरवठा खात्रीने पोहचविण्यासाठी, रेल्वेने कोव्हिडचे लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. 23 मार्च ते 18 नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने उद्योग क्षेत्राची गरज पूर्ण करीत 35.53 दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरीत्या केली. अखंड वीजपुरवठा सुनिश्‍चित करण्यासाठी 2.62 लाखांपेक्षा जास्त वाघिणीद्वारे कोळशाची वाहतूक केली. याच कालावधीत 6,72,879 इतक्‍या वाघिणीद्वारे मालवाहतूक केली. मध्य रेल्वेने कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड, स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर विविध वस्तू वाहून नेणाऱ्या 13,981 वस्तूंच्या मालगाड्या चालविल्या. या कालावधीदरम्यान दररोज सरासरी 2792 वाघिणींची मालवाहतूक केली. 

मालाच्या वाघिणींची संख्या 
कोळशाच्या 2,62,327 वाघिणींची वाहतूक विविध ऊर्जा प्रकल्पांसाठी करण्यात आली. तसेच अन्नधान्य आणि साखरेच्या 8858 वाघिणींची वाहतूक केली. शेतकऱ्यांच्या खतांच्या 31,743 वाघिणी आणि कांद्याच्या 7616 वाघिणी; पेट्रोलियम पदार्थांच्या 63,305 वाघिणी, लोह आणि स्टीलच्या 17,349 वाघिणी; सिमेंटच्या 45,038 वाघिणी; 20,4021 कंटेनरच्या वाघिणी आणि सुमारे 32,622 वाघिणी डी-ऑईल केक (कडबा) व संकीर्ण वस्तूंच्या वाघिणीची वाहतूक करण्यात आली. 

The excellent performance of the Central Railway in the lockdown Transport of 35.53 million tons of goods

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com