esakal | मध्य रेल्वे मार्गावर अत्याधुनिक उत्तम रॅक, महिलांच्या डब्यांत CCTVची नजर
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वे मार्गावर अत्याधुनिक उत्तम रॅक, महिलांच्या डब्यांत CCTVची नजर

पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वे मार्गावर सुद्धा चेन्नईच्या इंटीग्रेट फॅक्टरीत (आयसीएफ)मध्ये तयार केलेली अत्याधूनिक उत्तम रॅक प्रवासी वाहतूकीसाठी मध्य रेल्वे मार्गावर सुद्धा सुरू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर अत्याधुनिक उत्तम रॅक, महिलांच्या डब्यांत CCTVची नजर

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वे मार्गावर सुद्धा चेन्नईच्या इंटीग्रेट फॅक्टरीत (आयसीएफ)मध्ये तयार केलेली अत्याधूनिक उत्तम रॅक प्रवासी वाहतूकीसाठी मध्य रेल्वे मार्गावर सुद्धा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्ट्रीने महिलांच्या सर्वच डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेत. डब्यांमध्ये इंटेरीयर सुद्धा आकर्षित करण्यात आले आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर या रॅकला सर्व प्रवाशांसाठी वापरल्या जात आहे. यामध्ये लाकडाच्या एफआरपीची आसने बसविण्यात आले आहे. त्यावर पाण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यासोबतच चैन पुलिंग करण्याची पद्धत सुद्धा बदलून बटनची सोय देण्यात आली आहे. प्रवाशांना उभे राहण्यासाठी मोठे हॅन्डल आणि पंखे सुद्धा उर्जा बचत करणारे लावण्यात आले आहे. त्यातच डब्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी व्हेटिंलेशन सुद्धा उत्कृष्ठ देण्यात आले आहे.

अधिक वाचा-  शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, फडणवीसांच्या निर्धारावर राऊतांचा टोला

उत्तम रॅकची वैशिष्ट्ये

  • मोटरमॅन डब्याच्या समोरील आणि गार्डमॅनच्या मागच्या बाजूस दोन्ही जागी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.

  • रॅकच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमूळे फलाटावरील दुष्य सुद्धा स्पष्ट दिसून येते.

  • महिलांच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.
  • सर्व सीसीटीव्ही कॅमेराचे व्हिडीओ गार्डमॅनला पाहता येणार आहे.
  • आपात्कालीन परिस्थितीत चेन पुलिंगसाठी दिलेली पुश बटन आॅपरेट करण्यास सोपे होणार आहे. 
  • सर्व डब्यांमध्ये एलईडी दिवे लावण्यात आले आहे. 
  • प्रथम श्रेणी डब्यांमध्ये आरामदायक कुशनची आसने बसविण्यात आले आहे. 
  • डब्यांना आणखी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Excellent racks central railway line Passengers get safe travel CCTV footage women compartments

loading image