महागड्या वैद्यकीय चाचण्या होणार स्वस्त; मुंबई महापालिकेचे नवे धोरण; गरजूंना दिलासा 

समीर सुर्वे
Monday, 28 September 2020

  • गरजू रुग्णांच्या महागड्या वैद्यकीय चाचण्या कमी शुल्कात व्हाव्यात यासाठी मुंबई महापालिका धोरण तयार करत आहे.
  • खासगी सहभागातून ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे

मुंबई : गरजू रुग्णांच्या महागड्या वैद्यकीय चाचण्या कमी शुल्कात व्हाव्यात यासाठी मुंबई महापालिका धोरण तयार करत आहे. खासगी सहभागातून ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.महापालिकेने दवाखाने आणि प्रसुतीगृहांसाठी चिकीत्सा सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यात विविध प्रकारच्या रक्त चाचणी 100 ते 150 रुपयात होतात. त्याच बरोबर आता सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी, एमआरआय अशा चाचण्याही खासगी सहभागातून माफक दरात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

बाजारात व्हेंटिलेटरचा तुटवडा; दर्जा योग्य नसल्याने नवी मुंबई महापालिकेची खरेदी रखडली

यासाठी पॉलिक्लिनीक, डे केअर, डायग्नॉसिस सेंटर यांच्या बरोबर करार करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने महासभेच्या पटलावर मांडली आहे.यासाठी  प्रशासन धोरणही ठरवत आहे. महापालिकेचे 186 दवाखाने आणि 208 आरोग्य केंद्र आहेत. या मार्फत प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवली जाते. तर, ‘आपली चिकीत्सा योजने’ अंतर्गत रक्त चाचण्याही दवाखान्या.मार्फत केल्या जात असून आता विविध चाचण्या ही होणार आहेत. 

माझं कुटुंब,माझी जबाबदारी अभियानातून लोकप्रतिनिधींचा काढता पाय; आशा स्वयंसेवकांकडे ढकलली जबाबदारी

निदान वेळेत होण्यास मदत 
सीटी स्कॅन, एमआरआय या महागड्या चाचण्या आहेत. त्या माफक दरात उपलब्ध होतीलच त्याच बरोबर आजाराचे निदानही वेळेत होण्यास यामुळे मदत होईल, असे पालिकेच्या एका अधिका-याने सांगितले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expensive medical tests will be cheaper Mumbai Municipal Corporations new policy