Ambernath : रासायनिक कंपनीतील स्फोटाने आणि नंतरच्या वायूगळतीने अंबरनाथ हादरले; एका कामगाराचा मृत्यु, पाच जखमी

कंपनीतील एक कामगार मृत्युमुखी, पाच जखमी
Ambernath
Ambernathsakal

अंबरनाथ - अंबरनाथमधील वडोळ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपनीतील केमिकलच्या टाक्यांचा स्फोटांचा आवाज आणि त्यापाठोपाठ झालेल्या वायू गळतीने अंबरनाथ हादरले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे कंपनीतील सहा कामगार जखमी झाले असून एक जण मरण पावल्याची घटना आज घडली. रात्री उशिरापर्यंत वायुगळती सुरु होती.

कल्याण - बदलापूर महामार्गावरील आयटीआयजवळ असलेल्या ब्ल्यू जेट हेल्थ केअर कंपनीच्या दोन नंबर युनिटमध्ये आज शनिवार (१० ) जून रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. कंपनीतून पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या दूरचे लोट हवेत मिसळत होते, धुरामुळे परिसरातील नागरिकांचे डोळे चुरचुरणे, श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्याच्या घटना घडल्या. कंपनी परिसरातील सर्वांच्या तोंडाला रुमाल अथवा मास्क लावण्यास सांगण्यात आले होते.

Ambernath
Mumbai: मुंबई उपनगरात रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

या कंपनीत डाय नायट्रो बेन्झो बाय फ्लोरोडा या रसायनाचा वापर फार्मा कंपनीसाठी उपयोग केला जातो. त्यातील एका टाकीला आज दुपारी चारच्या सुमाराला गळती झाली आणि ती टाकी रासायनिक द्रव्यांच्या ड्रमवर पडली आणि त्यानंतर स्फोट झाला.

स्फोटानंतर पिवळ्या रंगाचा उग्र वासाचा धूर हवेत पसरू लागल्याने कंपनी आणि परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास जाणवू लागला. काही ठराविक अंतरानंतर कंपनीतून स्फोटाचे कानठळ्या बसवणारे आवाज येत असल्याने वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ नगरपालिका आणि एमआयडीसी येथून अग्निशमन दलाची वाहने बोलावण्यात आली होती.

Ambernath
Mumbai : दीड वर्षाची चिमुरडी आईच्या कुशीत निजलेली, तितक्यात अपहरणकर्त्यानं..; रेल्वेतील थरारक घटना समोर

आणि रुग्णवाहिका सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे पहावयाला मिळाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात ठेवण्यात आला होता. कंपनीत दुपारी चारला घटना घडली मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत काही अंतरा अंतराने स्फोटाचे आवाज येत होते. कंपनीच्या परिसरात रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने क्षणाक्षणाला भीतीमध्ये वाढ होत होती. परिसरात नागरिकांची गर्दी उसळली होती.

या दुर्घटनेत सूर्यकांत झिमान हा कामगार मरण पावला, जखमींवर उल्हासनतरच्या खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com