बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; मुंबईतून एकाला अटक 

अनिश पाटील
Wednesday, 2 September 2020

घरातूनच सुरु असलेल्या बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाला (सीआययु)यश आले असून त्याप्रकरणी कर्नाटकमधील 30 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

मुंबई - घरातूनच सुरु असलेल्या बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाला (सीआययु)यश आले असून त्याप्रकरणी कर्नाटकमधील 30 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी निशांत नागराज शिरसिकरने आतापर्यंत अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांना कोटयवधी डॉलर्सना गंडा घातला आहे.

मूळचा कर्नाटकचा रहिवासी असलेला निशांत हा मालाड परिसरात भाड़ेतत्त्वावर रहात होता.कॉल सेंटरमध्ये नोकरी करताना त्याने स्वत:च बोगस आंतराष्ट्रीय कॉल सेंटर सुरु केला.  याच कॉल सेंटरच्या माध्यमातून त्याने गेल्या पाच वर्षात आमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची कोटयवधी डॉलर्सना फसवणूक केली आहे.

मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम

सीआययुचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 29 ऑगस्ट रोजी निशांतला मालाड येथून ताब्यात घेतले. बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत निशांतला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 40 लाख रूपयांच्या रोख रक्कमेसह 10 लाखांची सोन्याची बिस्कीटे, अंमली पदार्थ आणि चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय    

गेल्या पाच वर्षापासून तो घरातूनच बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवत होता. त्याने साथीदारांच्या मदतीने भारतातील विविध शहरांमधून मोबाईल फ़ोनद्वारे अमेरिका, कॅनडामधील नागरिकांना लक्ष्य करत, कोटयवधी डॉलर्सना गंडा घातला आहे. महसूल सेवा, युएसए सिटिझनशिप किंवा इमिग्रेशन अधिकारी असल्याचे भासवून सरकारकडे थकबाक़ी रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाईची भिती घालून पैसे उकळत होते

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exposing bogus international call centers; One arrested from Mumbai