ठाणे आरटीओ अधिकाऱ्यांकडून खासगी बस वाहतूकदारांची पिळवणूक; कोणी केलाय हा धक्कादायक आरोप वाचा

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

कोरोना महामारीमुळे खासगी वाहतूकदार व्यावसायिक प्रचंड आर्थिक संकटास सापडले आहे. नुकतेच लाॅकडाऊन शिथील केले असतांनाही, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली जात नाही.

मुंबई : कोरोना महामारीमुळे खासगी वाहतूकदार व्यावसायिक प्रचंड आर्थिक संकटास सापडले आहे. नुकतेच लाॅकडाऊन शिथील केले असतांनाही, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली जात नाही. अशापरिस्थितीत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बस वाहतूकदारांना ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील भरारी पथके तपासणीच्या नावाखाली तासंतास तपासणी करून हेतुपूरस्पर पिळवणूक करत असल्याचा आरोप मुंबई बस मालक संघंटनेने केला आहे. 

VIDEO! बोरिवलीतील इंद्रप्रस्था शॉपिंग सेंटरला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल

मुंबई उपनगरातील आपत्कालीन सेवा पुरविणाऱ्या आणि रूग्णालय तसेच बँक कर्मचार्‍यांची या खासगी बसेस वाहतूक करतात. मात्र, या बसेसला वारंवार थांबवून हेतुपूरस्पर तपासणी केली जात आहे. ठाणे परिवहन विभागाच्या ठाणे घोडबंदर रोडच्या प्रवेशद्वारावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तपासणीच्या नावावर बसेस थांबवून ठेवत असल्याने, कर्मचाऱ्यांना लेटमार्क सहन करावा लागतो आहे. 

यापुर्वी राज्यातील खासगी बस वाहतूकदारांनी बस वाहतूकीसाठी राज्य आणि केंद्राने परवानगी दिली नसल्याने वाहने आरटीओ कार्यालयात जमा करण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची खासगी बस वाहतूकदारांनी भेट घेतली होती. दरम्यान राज्यस्तरीय वाहतूक कृती दलाची स्थापना केल्यानंतर कृती दलाचा अहवाल सरकारला सादर होताच, वाहतूकदारांना दिलासा देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले होते. मात्र, अद्याप ही आरटीओ अधिकाऱ्यांकडून खासगी बस वाहतूकदारांना हेतुपूरस्पर त्रास देणे सुरूच असल्याचा आरोप मुंबई बस मालक संघंटनेने केला आहे.  यासंदर्भात ठाणे आरटीओ रवी गायकवाड यांना फोन आणि मॅसेजद्वारे प्रतिक्रीया मागितली असता, त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही. 

हुश्श...अखेर निळजे रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला! अवघ्या 15 दिवसात 'एमएसआरडीसी'ने केली पुलाची दुरुस्ती

वाहने अडवल्याने वाहतूक कोंडी
तपासणीच्या नावाखाली ठाणे आणि इतर आरटीओ विभागातील भरारी पथक खासगी बस वाहतूकदारांची वाहने थांबवून ठेवत असल्याने, अनेक वेळा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीतही आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हेतुपूरस्पर विविध कागदपत्रांची मागणी करून त्रास दिला जात असल्याचा आरोप सुद्धा या वाहतुकदारांनी केला आहे.

एका क्लिकवर बसचा तपशिल उपलब्ध
बसच्या सर्व माहितीचे तपशील एका क्लिकवर एम-परिवहन अ‍ॅपवर पाहता येते. त्यानंतरही ठाणे परिवहन अधिकाऱ्यांमार्फत जाणीवपुर्वक वाहतुक थांबविण्यात येत असून, विविध कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामूळे वाहतुकीस अडथळा, प्रवाशांची गैरसोय आणि सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असून, प्रवाशांना कोरोनाची बाधेचा संसंर्ग होण्याची भिती वाढत असल्याचा आरोप सुद्धा वाहतूकदारांनी केला आहे. 

आरटीओची ही नियमीत कारवाई आहे. कोणत्याही प्रकारची जाणीवपुर्वक कारवाईचा यामध्ये उद्देश नाही. याबद्दल अधिक माहिती घेण्यात येईल.
- शेखर चन्ने, आयुक्त, राज्य परिवहन विभाग

नियमाप्रमाणे मोटर वाहन निरीक्षक बस तपासणी करत आहे. आणि मुंबई बस मालक संघटनेला त्यांच्या सोयीनुसार बस तपासणी हवी आहे. मात्र या तपासणी दरम्यान आम्ही बसमधील प्रवाशांमध्ये सोशल डिस्टनसिंगची सुद्धा तपासणी करत आहोत. 
- रवी गायकवाड, आरटीओ, ठाणे विभाग 

ठाणे आरटीओ विभागाच्या भरारी पथकाकडून हेतुपुरस्पर त्रास दिला जात आहे. बस मधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहून नेत असतांना सुद्धा घोडबंदर मार्गावर तपासणीच्या नावाखाली भरारी पथक तासंतास थांबवून ठेवत आहे.त्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होत असून,अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्क लागतो आहे.
- हर्ष कोटक, सरचिटणीस, मुंबई बस मालक संघटना 

-----------------------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extortion of private bus operators by Thane RTO officials; Read this shocking allegation made by someone