
डोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले कल्याण शीळ रोडवरील बार एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. महिन्याला 20 हजार रुपये द्या तरच बार चालवून देईल अशी धमकी एक व्यक्ती बार चालकांना देत आहे. पोलिसांकडे जाऊ नका ते जास्त पैसे घेतील अस म्हणत हा व्यक्ती पोलिसांना देखील शिवीगाळ करताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. या व्यक्तीमुळे बार चालक मालक त्रस्त झाले आहेत. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी चालकांनी केली आहे.