फॅबीफ्ल्यू परिणामकारक नाही? कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं निरिक्षण

मिलिंद तांबे
Tuesday, 20 October 2020

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना फॅबीफ्ल्यू हे औषध दिलं जातं, मात्र या औषधाचा परिणाम रूग्णांवर होत नसल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे

मुंबई, ता. 19 : कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना फॅबीफ्ल्यू हे औषध दिलं जातं, मात्र या औषधाचा परिणाम रूग्णांवर होत नसल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. फॅबीफ्ल्यू औषधाचे नियमानुसार डोस खाणा-या रूग्णांची तब्येत खालावत असल्याचे समोर आले आहे. 

कोरोनाबाधित रूग्णांना रेमडेसिविर, टॉसिलिझुमॅब या औषधांसह फॅबीफ्ल्यू हे औषध देखील दिले जाते. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना हे औषध दिलं जातं. मात्र या औषधाचा फारसा सकारात्मक परिणाम रूग्णावर होत नसल्याचे वन रूपी क्लीनिकचे प्रमुख डॉ राहूल घुले यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण

सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना फॅबीफ्ल्यू या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या सेवन केल्यानंतर आठवड्याभरात रूग्णाच्या तब्येतीत सुधारणे होणे गरजेचे आहे. मात्र या गोळ्या घेणाऱ्या काही रूग्णांचे निरिक्षण केल्यानंतर यातील अनेक रूग्णांची तब्येत खालावल्याचे दिसले. यामुळे या औषधाच्या उपयुक्तेतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कोरोना रूग्णांवर फॅबीफ्ल्यू औषध परिणामकारक नसल्याचे डॉ. राहूल घुले यांनी आरोग्य विभागाला कळलवले आहे. या औषधाऐवजी रेमडेसिविर हे औषध वापरणे अधिक योग्य असल्याचे ही डॉ. घुले यांना वाटत असून त्या बाबत त्यांनी शासनाला देखील कळवले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

fabiflu tablets are not working for many covid patients says dr rahul ghule


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fabiflu tablets are not working for many covid patients says dr rahul ghule