Dombivli Crime : कल्याणमध्ये बनावट पिस्तुलाचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Fake Gun Threat : डोंबिवलीतील काटेमानिवली भागात दोन चोरांनी बनावट पिस्तुलाच्या धाकाने कारखान्यात पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, मात्र मालकाच्या प्रसंगावधानामुळे दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Fake Gun Threat
Fake Gun ThreatSakal
Updated on

डोंबिवली : कारखान्यात शिरून त्यांनी मालकाकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच बनावट पिस्तुलचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. प्रसंगावधान राखत मालकाने दोघांना केला खोलीत ढकलून बाहेरून कडी लावत बंद करून घेतले. ही घटना कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात घडली शनिवारी दुपारी घडली. कारखाना मालक मोहम्मद शब्बीर शेख यांनी कोळसेवाडी पोलिसांना फोन केला असता पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून त्यांच्याजवळील पिस्तुल हे बनावट असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com