
पंतप्रधान विशेष कर्ज योजनांच्या नावाने बनावट अॅप्लिकेशन तयार करणा-या टोळक्याने देशभरातील अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
मुंबई: पंतप्रधान विशेष कर्ज योजनांच्या नावाने बनावट अॅप्लिकेशन तयार करणा-या टोळक्याने देशभरातील अडीच लाख रुपयांची फसवणूक करून चार कोटींची माया जमवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दै. सकाळने सर्वप्रथम याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
याप्रकरणी संजीव कुमार(36), प्रांजुल राठोड(27), रामनिवास कुमावत(25) आणि विवेक शर्मा(42) अशी अटक आरोपींची नावे आहेत. संजीव कुमार हा उत्तर प्रदेशातील अलीगड येथील रिवासी असून राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याला 15 फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आरोपींविरोधात भादंवि कलम 419, 420, 465, 468, 170, 34 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 66(क) आणि 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी प्रधानमंत्री योजना लोन, पीएम लोन योजना लोन, पीएमवायएल लोन, सर्वोत्तम फायनान्स लोन सर्विस अशा नावाने 9 अॅप्लिकेशन तयार केले होते. त्यावर पंतप्रधानांचे छायाचित्र आणि राजमुद्रा यांचा वार करण्यात आला होता. या कर्जासाठी आरोपींनी 900 ते 3 हजार रुपये प्रोसेसिंग फीच्या नावाने देशातील शेकडो व्यक्तींकडून घेतले.
हेही वाचा- केंद्र सरकारचं महाराष्ट्र, मुंबईवर प्रेम; कोविन अॅपवरुन महापौरांची टीका
आरोपींनी तोतयागिरीसह राजमुद्रा तसेच ओळखपत्र यांचा गैरवापर केला आहे. तसेच आरोपींनी नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी दोन नामांकित वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही दिली होती. त्यामुळे अनेकांनी आरोपींकडे पैसे भरले आहेत. आरोपींकडून 18 मोबाईल, 10 हार्ड डिस्क, 3 राऊटर व एक पेनड्राईव जप्त करण्यात आला आहे.
---------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Fake applications name Prime Minister Special Loan Scheme fraud 2.5 lakh people