
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या बनावट खात्यांद्वारे काही व्यक्तींकडे पैशाची मागणी करण्यात आली आहे. सावंत यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मुंबईः बनावट फेसबूक खाते तयार करून त्या व्यक्तीच्या मित्रांकडे पैशांची मागणी करणा-या सायबर टोळक्याने धुमाकुळ घातला असून नुकतीच त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना टार्गेट केले आहे. या बनावट खात्यांद्वारे काही व्यक्तींकडे पैशाची मागणी करण्यात आली आहे. सावंत यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
निकटवर्तीय व्यक्तीकडून सावंत यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंत यांनी स्वतः नागरिकांना या फसवणुकीपासून जागरुक करण्यासाठी संदेश पाठवले आहेत. तसेच समाज माध्यमांवरही त्यांनी संदेश पाठवून आपल्या नावाने कोणीतरी बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. संबंधित व्यक्ती अनेकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवत आहे. तसेच खासगी संदेश पाठवून पैशांची मागणी करत आहे. त्यामुळे कृपया अशा कोणतीही फ्रेन्ड रेक्वेस्ट स्वीकारू नका, तसेच पैसे देऊ नका, अशी विनंत सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे.
अधिक वाचा- अजान स्पर्धेच्या आयोजनावरून पांडुरंग सकपाळ यांचा आणखी एक खुलासा
याबाबत सावंत यांच्या जवळच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा देत याप्रकरणी सायबर पोलिस तपास करत असल्याचे सांगितले.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सावंत यांना रविवारी त्यांच्या मित्राचा फोन आला. त्यानंतर त्यांना या प्रकाराबाबतची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व समाज माध्यमांवर संदेश पाठवून नागरिकांना सतर्क केले. पोलिस सूत्रांनी ही वृत्ताला दुजोरा देत आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगितले. यापूर्वीही अशाच पद्धतीने अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींच्या नावाने बनावट खाते तयार करून पैसे मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर वावरत असताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
--------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Fake Facebook account in the name of Shiv Sena MP Arvind Sawant