फेक फॉलोअर्स प्रकरण! रॅपर बादशाहने लाईक, व्ह्यूसाठी दिले तब्बल एवढे लाख रूपये...

फेक फॉलोअर्स प्रकरण! रॅपर बादशाहने लाईक, व्ह्यूसाठी दिले तब्बल एवढे लाख रूपये...



मुंबई ः फेक फॉलोअर्सप्रकरणी सलग दोन दिवस चौकशी करण्यात आलेला प्रसिद्ध रॅपर बादशाह याने त्याच्या अल्बमच्या प्रसिद्धीसाठी लाईक्स मिळवण्यासाठी 72 लाख रुपये भरल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. विश्व विक्रम करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले.

गेल्यावर्षी आलेले बादशाहाचे गाणे पागल है एका दिवसात 72 लाख लोकांनी यूट्यूबवर पाहिले होते. त्यासाठी त्याने पैसे भरल्याचे निष्पन्न झाले आहे. कोणत्याही गायकाला एका दिवसात एवढे व्हू यापूर्वी मिळाले नव्हते. गायक आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया ऊर्फ बादशाह याने त्यासाठी 72 लाख रुपये भरले होते. फेक फॉलोअर्सप्रकरणी गुन्हे शाखेचे विशेष पथक सध्या तपास करत आहे. त्यांनी याप्रकरणी आतापर्यंत 10 व्यक्तींची चौकशी केली आहे. त्यात कंपनीचे विशेष कार्यकारी अधिकारी, मॉडेल अशा व्यक्तींचा समावेश आहे.

गेली दोन दिवसापासुन रॅपर गायक आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया उर्फ बादशहाकडे कसून चौकशी सुरु आहे. जाहिराती मिळवण्यासाठी बनावट चाहते निर्माण करणे, कृत्रिमरित्या चाहत्याची संख्या वाढविणे, अशा बनावट चाहत्यांची खरेदी विक्रीचा गैरव्यवहार विशेष पथकाने उघड केला होता. या प्रकरणी काही प्रसिद्ध् सोशल मिडीया मार्केटींग कंपन्यांच्या प्रमुखांसह बॉलीवूडमधील प्रभावशाली व्यक्तींची चौकशी सुरू आहे. तसेच अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या इन्स्टाग्राम खात्याची तांत्रिक झाडाझडती या पथकाकडून सुरू आहे. एखाद्याच्या खात्यावर चाहत्यांची संख्या, प्रतिसादाचे प्रमाण (लाईक, व्हयू) अचानकपणे वाढले असेल तर त्या व्यक्तीला पथक चौकशीसाठी बोलावते. त्यातूनच बादशहाला समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. गुरुवारी तीन तास त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्याची चार तास चौकशी करण्यात आली होती. त्यात दोनशेहून अधिक प्रश्न बादशाहला विचारण्यात आले होते.

याबाबत बादशाहकडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यता आली असून त्यात समन्सनुसार आपण मुंबई पोलिसांना भेटून बोललो.माझ्यावतीने मी अधिका-यांना तपासात मदत करत असून मी कोणत्याही चूकीच्या कामात सहभागी नाही. तसेच त्याचा वापर केलेला नाही. माझा यंत्रणावर पूर्ण विश्वास असून कायद्या अंतर्गत ते काम करत आहेत. तसेच माझ्याबद्दल चिंता व्यक्त करणा-या सर्वांचा मी आभारी असल्याचे बादशाहकडून सांगण्यात आले

-------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com