फेक TRP प्रकरणः हंसाच्या माजी कर्मचाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक

अनिश पाटील
Tuesday, 13 October 2020

फेक टीआरपी प्रकरणी हंसाच्या माजी कर्मचा-याला गुन्हे शाखेने  उत्तर प्रदेशातून अटक केली. ही प्रकरणातील पाचवी अटक आहे. याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून संशयित बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.

मुंबई:  फेक टीआरपी प्रकरणी हंसाच्या माजी कर्मचा-याला गुन्हे शाखेने  उत्तर प्रदेशातून अटक केली. ही प्रकरणातील पाचवी अटक आहे. याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून संशयित बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.

विनय त्रिपाठी(30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विनय अटक आरोपी विशाल भंडारीला पैसे देत होता. याप्रकरणी आणखी एका बड्या वृत्तवाहिनीच्या नावाची चर्चा होती. त्या वाहिनीचे काम त्रिपाठी मार्फत आल्याची माहिती आहे. त्यामुळे या बड्या वृत्तवाहिनीच्या सहभागाबाबतची माहिती त्रिपाठीकडून मिळणार आहे.

याप्रकरणी उत्तर प्रदेशात गुन्हे शाखेची दोन पथके असून ते आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी इतर आरोपींच्या अटकेपूर्वीच  त्रिपाठीने उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे गेला होता. मालाड येथील रहिवासी असलेला त्रिपाठीने चार वर्ष हंसामध्ये काम केले आहे. 2018 मध्ये त्याने तेथील काम सोडले होते. त्याला मंगळवारी उत्तर प्रदेशातील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर मुंबई आणण्यात येणार आहे.

अधिक वाचाः  कोरोना नियंत्रणातच, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

याशिवाय याप्रकरणी सोमवारी हंसाचे सीईओ प्रवीण निझार यांचा जबाब नोंदवण्यात आला. तसेच हंसाचे डेप्युटी मॅनेजर नितीन देवकरचेही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं. त्यांच्याकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. घनश्याम सिंग रिपब्लिकचे डिस्ट्रिब्युटर हेड आणि सीओओ विकास खानचंदानी त्यांना सोमवारी साडेपाच वाजता कागदपत्रासहित बोलावण्यात आले होते.

रिपब्लिक टीव्हीचे सिएफओ शिवा सुंदरम आज चौकशीला हजर राहणार आहेत. मी आज मुंबईत संध्याकाळी येणार आहे. तपासाला सहकार्य करीन, असे त्यांच्याकडून कळवण्यात आले आहे. सुंदरम यांचे 3 कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत म्हणून येत नसल्याचे त्यांनी कळवले आहे. सुंदरम यांच्याकडून कोविडचे कारण  पुढे करण्यात आले होते. त्याची पडताळणी पोलिस करणार आहेत.

फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांच्या चॅनेलच्या मालकांचे आणि चॅनेलचे काही बँक खाती गोठवण्यात आली आहेत. 102 सीआरपीसी  अंतर्गत ही चार खाती गोठवण्यात आलीत. संपूर्ण प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठीच टेंडर्स सोमवारी जारी करण्यात आले. संशयित वाहिन्यांच्या खात्यातील पैशांची आणि व्यवहारांची तपासणी होणार आहे. रिपब्लिककडून सांगण्यात आलं की त्यांचं उत्पन्नाच साधन फक्त जाहीरात आहे. फक्त मराठी आणि बॉक्सच्या चॅनेलच्या खात्यात कोटयवधी रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी आतापर्यंत टीआरपी स्कॅम प्रकरणात 36 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत.

अधिक वाचाः   मेट्रो 3 मार्गाच्या भुयारीकरणाच्या कामासाठी 10 हजार स्फोट

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Fake TRP case Former Hansa employee arrested by Crime Branch


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake TRP case Former Hansa employee arrested by Crime Branch