esakal | Fake TRP | टीआरपी गैरव्यवहार झाल्याचे "बीएआरसी'च्या अहवालातून स्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Fake TRP | टीआरपी गैरव्यवहार झाल्याचे "बीएआरसी'च्या अहवालातून स्पष्ट

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) अंतर्गत ऑडिट अहवालानुसार टीआरपी गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचे पुरावे, गुन्हे शाखेला प्राप्त झाले आहेत. याप्रकरणी नुकतीच 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Fake TRP | टीआरपी गैरव्यवहार झाल्याचे "बीएआरसी'च्या अहवालातून स्पष्ट

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई  : ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) अंतर्गत ऑडिट अहवालानुसार टीआरपी गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचे पुरावे, गुन्हे शाखेला प्राप्त झाले आहेत. याप्रकरणी नुकतीच 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

ED च्या नोटिशीवर एकनाथ खडसे यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया 

अहवालात एका इंग्रजी वृत्तवाहिनीचा टीआरपी कमी असूनही बीएआरसीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी या वृत्तवाहिनीचा टीआरपी तुलनेने जास्त दाखवल्याचे म्हटले आहे. या माहितीच्या आधारे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. बीएआरसी ही संस्था भारतीय माहीत व प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते. या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास तीन हजार बोरोमीटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते व त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटिंग दिले जाते. बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्जनुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणाऱ्यांना पैसे देतात. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष्य केलेल्या वाहिन्यांना झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी भादंवि कलम 409, 420, 465, 468, 406, 120(ब), 201, 204, 212 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत याप्रकरणी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
Fake TRP It is clear from the BARC report that TRP was abused

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top