पांढऱ्या पॅन्टवरून मुंबई पोलिसांनी 'असं' पकडलं पाकिस्तानी तस्कराला...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पोलिसांच्या चलाखीमुळे आरोपी गजाआड

मुंबई -  मुंबई विमानतळावर क्राईम ब्रांच पोलिसांच्या चलाखीमुळे २ हजाराच्या बनावट नोटा भारतात आणणाऱ्यास एकाला अटक करण्यात आली आहे. तब्बल २४ लाख रुपये किंमतीच्या या नोटा पाकिस्तानातून दुबईमार्गे भारतात आणण्यात येत होत्या. दरम्यान पोलिसांच्या चलाखीमुळे या तस्कराला आता जेरबंद करण्यात आलंय. 

हेही वाचा - एक किस पाडू शकेल तुम्हाला आजारी, भयंकर आजारी...

या प्रकरणी कळवा येथे राहणाऱ्या जावेद शेख या ३६ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाबा म्हणजे दोन हजारच्या या बनावट नोटा सुरक्षेच्या तब्बल ९ पैकी ७ चाचण्यांमध्ये पास झाल्या. अवघ्या दोन चाचण्यांमुळे या २००० च्या नोटा बनावट असल्याचं समोर आले आहे. 

खोट्या नोटांमध्ये काय नव्हतं  : 

खऱ्या भरतोय नोटेत ९ सेक्युरिटी फीचर्स आहेत. यापैकी ७ फीचर्स या नोटमध्ये आढळलेत. दरम्यान या बनावट नोटेला वेगवेगळ्या अँगलमधून पाहिल्यावर जो शाईचा शाईचा रंग बदलतो ते फिचर आणि सूर्यप्रकाशात पाहिल्यावर ज्या बारीक गोष्टी दिसतात त्या गोष्टी या बनावट नोटांमध्ये नव्हत्या. 

जावेद हा दुबई येथून विमानाने मुंबई येथे आला. दरम्यान याआधी पाकिस्तानातून त्याने बनावट नोटा सोबत घेतल्या असून विमानतळावरील सुरक्षाद्वारातून अगदी सहज बाहेर निघून आला, मात्र त्यानंतर बाहेरील एका बस स्थानकावर पोलिसांनी त्याला अटक केली.

महत्त्वाची बातमी - 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरे

सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बनावट नोटा इतक्या हुबेहूब तयार करण्यात आल्या आहेतकी, सामान्य व्यक्ती यातील फरक देखील सांगू शकणार नाही.

दरम्यान पोलिसांना CIA कडून मिळालेल्या माहितीमुळे जावेद याला पकडण्यात यश आले. त्याने घातलेल्या सफेद रंगाच्या पँटमुळे त्याला पकडण्यात यश आले आहे. सध्या नोट तस्कर जावेद याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून क्राईम ब्रांच पोलिस त्याची चौकशी करत आहेत. तसेच या बनावट नोटा तयार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट आहे का? याबाबतही पोलिस तपास करत आहेत.

महत्त्वाची बातमी - अशी चुकवली त्याने विमानतळाची सुरक्षा

विमानतळावरील अत्यंत कडक सुरक्षेला देखील चुकवण्यासाठी जावेद याने युक्ती लढवली. सुरक्षद्वाराजवळ असणाऱ्या बॅग स्कॅनरमध्ये जर नोटा बंडल स्वरुपात ठेवल्या तर त्या डिटेक्ट होतात. मात्र जर नोटा या विस्कटून ठेवल्या असल्यास त्या डिटेक्ट होत नाहीत. याचाच फायदा घेत जावेद याने घेतला. त्याने उशीमध्ये नोटा विस्कटून ठेवल्या ज्यामुळे त्या डिटेक्ट झाल्या नाहीत. 

fake two thousand notes are coming from Pakistan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake two thousand notes are coming from Pakistan