Farah Khan: फराह खानचा कंटेंट क्रिएटर्सना सल्ला; ‘सहजता, वास्तव आणि विनोदातूनच उत्तम कंटेंट’

Edits Film Festival: एडिट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तीन क्रिएटर्सचा गौरव; फराह खान यांनी मांडला कंटेंटचा दृष्टिकोन
edits film festival

edits film festival

esakal

Updated on: 

सहजता, वास्तवाशी जोडलेपण आणि विनोद यांचा मेळ साधणाऱ्या कंटेंटला प्रेक्षक अधिक चांगला प्रतिसाद देतात, असे मत चित्रपट निर्माती फराह खान यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित ‘एडिट्स फिल्म फेस्टिव्हल’च्या समारोपाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या महोत्सवात इशांक गुप्ता, सान्या रोहिल्ला आणि अहसान वझीर यांना उत्कृष्ट कंटेंट निर्मितीसाठी विजेते म्हणून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला फेस्टिव्हलच्या परीक्षक अहसास चन्ना, डॉली सिंग, निखिल तनेजा आणि राजीव मसंद यांच्यासह १०० हून अधिक कंटेंट क्रिएटर्स उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com