

Farmer Loan Waiver Data Row Commercial Banks Show Excess Interest Charges 55 Lakh Accounts Sent for Special Audit
sakal
-सदानंद पाटील
मुंबई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही व्यापारी बँकांकडून गंभीर त्रुटी व हेराफेरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांच्या व्याज आकारणीत अवाच्या सवा वाढ करून नाव, बँक खात्याचा तपशील आणि कर्ज प्रकरणात मोठी तफावत दाखविल्याचे उघडकीस आले आहे.