esakal | 'मला आश्चर्य वाटतंय, हा निर्लज्ज माणूस कृषिमंत्री होता'; भाई जगताप यांचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

'मला आश्चर्य वाटतंय, हा निर्लज्ज माणूस कृषिमंत्री होता'; भाई जगताप यांचा संताप

दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक झाल्याच्या विषयावर बोलताना माजी कृषि मंत्री अनिल बोंडे आणि कॉंग्रेसनेते भाई जगताप यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

'मला आश्चर्य वाटतंय, हा निर्लज्ज माणूस कृषिमंत्री होता'; भाई जगताप यांचा संताप

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई :  दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आज देशाने पाहिलं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसक ट्रॅक्टर रॅलीमुळे देश ढवळून निघाला. त्यावर देशभरातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या. राज्याचे माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांनी देखील या हिंसक आंदोलनावर टीकात्मक प्रतिक्रीया एका खासगी वृत्तवाहिनीला दिली. त्यावर कॉंग्रसचे भाई जगताप यांनी ' काय बोलतोय हा माणूस, हा कृषि मंत्री होता याचं आश्चर्य वाटतंय, निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय' अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने, त्याचे पडसाद महाराष्ट्रातही पडले. शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रसचे बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. याबाबत एका वृत्तवाहिनीवर माजी कृषि मंत्री अनिल बोंडे आणि कॉंग्रेसनेते भाई जगताप यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भाई जगताप काय म्हणाले?
मला या माणसाचं आश्चर्य वाटतं, हा कृषी मंत्री होता. इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, थोडी जरी शेतकऱ्यांबद्दल चाड असती, शेतकऱ्यांची व्यथांची.. काय गोष्टी करतोय हा माणूस कोण आहे हा?…. दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले. लाज वाटली पाहिजे, यांना सत्तेचा माज आलाय… यांचा माज बाहेर येतोय.. देशाचा अन्नदाता बसलाय दिल्लीत.. ते काही काँग्रेसवाले आहेत का…? इतकं अंधाधूंद माजलेले आहेत तुमचा माज शेतकरी आणि कामगार उतरवेल. यांनी हे केले त्यांनी ते केलं असं सांगता, तुम्ही काय केलं हे सांगा अशा शब्दांमध्ये भाई जगताप यांनी संताप व्यक्त केला.

अनिल बोंडे काय म्हणाले?
नरेंद्र मोदींना मतदानाच्या माध्यमातून हरवता येत नाही. आज जेव्हा भारत सर्व आघाड्यांवर अग्रस्थानावर आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अराजक निर्माण करुन मोदींना नामोहरम करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. भाई जगताप, राहुल गांधी यांचे संपूर्ण भारतात अराजक माजवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचं काम काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षानं केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला.

Farmer protest bhai jagtap criticize on former agriculture minister anil bonde on delhi tractor rally

--------------------------------------

loading image