
मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. राज्यातील आमदार नितीन पवार, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे यांनी अजित पवार यांना पत्र लिहून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. याची दखल घेत पवार यांनी गोयल यांना पत्र लिहिले आहे.