आंदोलक शेतकऱ्यांना "लंगर'चा आधार; शेतकऱ्यांसाठी शीख तरुणांची धाव

दिनेश चिलप मराठे
Monday, 25 January 2021

केंद्राच्या कृषि व कामगार कायद्याविरोधात तसेच दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी एकवटले आहेत.

मुंंबई  : केंद्राच्या कृषि व कामगार कायद्याविरोधात तसेच दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी एकवटले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण, वयोवृद्ध शेतकरी पुरूष, महिलांचे जत्थेच्या जत्थे येथे दाखल होत आहे. आंदोलनात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून मुंबई, नवी मुंबईतील शिख तरुण, तरुणी पुढे सरसावल्याचे चित्र यावेळी दिसून आले. 

नोकरदार तरुण तरणजीत सिंग, महाविद्यालयीन तरुणी जसलीन कौल आणि नवज्योतसिंग शेतकरी आंदोलकांसाठी आझाद मैदानात तळ ठोकून असून त्यांना वेळोवेळी चहा व पाण्याचे वाटप करत आहे. गुरुज्योत सिंग यांनी दादर गुरुद्वारामार्फत लंगरची व्यवस्था केली आहे. त्यामाध्यमातून आंदोलकांना न्याहारी व तीन वेळचे जेवण दिले जात आहे. नवज्योत यांची आई मनिंदर कौर या नाशिक येथे राहतात; मात्र आंदोलकांच्या सेवेसाठी मैत्रिणीसह त्यांनी मुंबई गाठली असून आंदोलकांना त्यांनी दाळ, रोटीचे वाटप केले आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या तीन दिवसांत लाखाहून अधिक लोकांनी लंगरचा लाभ घेतल्याचे गुरूज्योत यांनी सांगितले. आंदोलकांनी जेवणाची चिंता करू नये, त्यांच्यासाठी आम्ही येथे आहोत, असे गुरुज्योत यांनी म्हटले आहे. याशिवाय अखिल भारतीय महिला जनवादी संघटनेच्या कविता हटकर, पार्वती शेट्टीगर, के. के. लतिका यादेखील आंदोलकांना अल्पोपहाराचे वाटप करत आहेत. 
Farmers protest mumbai Support of langar to agitating farmers Sikh youth work for farmers

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers protest mumbai Support of langar to agitating farmers Sikh youth work for farmers