शरद पवार गरजले; 'सावरलेला पंजाब पुन्हा अस्वस्थतेकडे नेऊ नका' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार गरजले; 'सावरलेला पंजाब पुन्हा अस्वस्थतेकडे नेऊ नका'

आज जे घडतंय त्याचे समर्थन नाही. मात्र ते का घडतंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

शरद पवार गरजले; 'सावरलेला पंजाब पुन्हा अस्वस्थतेकडे नेऊ नका'

मुंबई : आज दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाची कृषी मंत्री राहिलेले शरद पवार यांनी पातुरकर परिषद घेतली. पत्रकार परिषदेतून शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आणि आजच्या हिंसक उद्रेकावर भाष्य केलं.   

याबाबत बोलताना शरद पवार म्हणालेत की....

काल मी भाषणात उल्लेख केला होता, जी कायद्यांविषयी चर्चा सुरु आहे ती २००३ पासून सुरु आहे. मी कृषिमंत्री असताना माझ्याकडे या चर्चेची जबाबदारी सोपवण्यात आलेली.माझ्या उपस्थितीत काही बैठका देखील झाल्यात. मात्र ती चर्चा अपूर्ण राहिली होती. त्यानंतर निवडणूक झाल्यात, नवीन सरकार आलं अशात नवीन सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन, सर्व राज्यांना विश्वासात घेऊन चर्चा करायला हवी होती. नवीन सरकार आल्यानंतर तो विषय मागे राहिला. 

सिलेक्ट कमिटीमध्ये निर्णय झाला असता तर कुणाचा विरोध झाला नसता

यानंतर या विषयीचे तीन कायदे मोदी सरकारने संसदेसमोर आणले, कायदे संसदेत आणण्यामागे कुणाचा विरोध नव्हता. मात्र विरोधकांच्या मते ही बिले सिलेक्ट कमिटीकडे पाठवावी, त्यामध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर निर्णय घेता आला असता. सिलेक्ट कमिटीमध्ये होणारे निर्णय पक्षाच्या पातळीवर न होता विषयाला धरून होतात आणि एकमताने होतात. सिलेक्ट कमिटीमध्ये निर्णय झाला असता तर कुणाचा विरोध झाला नसता. 

सरकारने प्रो ऍक्टिव्हली स्टॅन्ड घेऊन मार्ग काढायला हवा होता

ही तीनही बिले गोंधळात पास केली गेली, तेंव्हापासऊनच मला वाटत होतं की हे कुठेतरी बिघडणार आणि याची कुठेतरी प्रतीक्रिया शेतकरी वर्गाकडून येईल, ती आता आली आहे. पंजाब, हरियाणा मधील शेतकऱ्यांनी या कायद्यासंबंधित एक भूमिका घेतली आणि संयमी आंदोलन केलं. शेतकरी साठ दिवस बसतात आणि संयम दाखवतात, ही अभूतपूर्व गोष्ट आहे. मात्र संयमाने भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांशी वाटाघाटी करताना सरकारने प्रो ऍक्टिव्हली स्टॅन्ड घेऊन मार्ग काढायला हवा होता.  

समंजसपणे पाहण्याची गरज

साठ दिवस संयमी आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक वेगळं आंदोलन करण्यासाठी ट्रॅक्टरचा मोर्चा आयोजित केला होता. संयमाने आंदोलन केलं ते लोक रस्त्यावर उतरत असताना कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याकडे समंजसपणे पाहण्याची गरज होती. मात्र असं घडलेले नाही हे स्पष्ट आहे.  

वेगळी भूमिका घेतली गेली आणि वातावरण चिघळले

हा सर्व परिसर देशाचा अन्नदाताआहे, देशाच्या अन्नाची गरज भागवयची मोलाची कामगिरी हा भाग निभावतो. त्यांनी ट्रॅक्टर आंदोलन घेतल्यानंतर ज्या पद्धतीने येणं आणि जाण्याच्या पारवानग्या देण्याची आवशयकता होती तिथे जाचकअटी टाकल्या गेल्या. ज्याचा प्रतिकार झालेला दिसतोय. प्रतिकार झाला तरी ६० दिवसांचं आंदोलन आणि त्यांचं संयम नजरेसमोर ठेऊन आंदोलन हाताळण्याची गरज असताना त्याठिकाणी वेगळी भूमिका घेतली गेली आणि वातावरण चिघळले. 

आज जे घडतंय त्याचे समर्थन नाही

आज जे घडतंय त्याचे समर्थन नाही. मात्र ते का घडतंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज शेतकरी संतत्प का होतोय ते पाहणे महत्त्वाचे आहे. हे प्रकरण हाताळण्याची जबाबदारी केंद्राची होती, ती त्यांनी पाळलेली नाही आणि त्यामुळेच हे प्रकरण घडलं आहे. अजूनही केंद्राने शहाणपणा दाखवावा आणि या सगळ्या घटकांशी बोलत असताना एकदम टोकाची भूमिका सोडावी, डायलॉग करावा, राष्ट्र प्रश्नाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अनुकूल निर्णय घ्यावा. 

अस्वस्थ पंजाब आपण पाहिलेला आहे

बाळाचा वापर करून आपण काहीही करू शकतो अशी जर भूमिका घेतली तर अस्वस्थ पंजाब आपण पाहिलेला आहे, तो पूर्ण सावरला आहे. मात्र पुन्हा पंजाब अस्वस्थतेकडे नेण्याच्या दिशेने पावलं मोदी सरकारने टाकू नये असं माझं मोदी सरकारला सांगणं आहे. 

farmers tractor march in delhi reaction of NCP chief sharad pawar on farmers

Web Title: Farmers Tractor March Delhi Reaction Ncp Chief Sharad Pawar Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top