आयआयटी मुंबईच्या हर्च्युअल टेकफेस्टमध्ये हायपरलूपचा वेगवान प्रवास

आयआयटी मुंबईच्या हर्च्युअल टेकफेस्टमध्ये हायपरलूपचा वेगवान प्रवास
Updated on

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठा तंत्रविज्ञान महोत्सव म्हणून ओळखल्या जाणारा आयआयटी मुंबईचा ‘टेकफेस्ट’ यंदा व्हर्चुअल पद्धतीने पार पडणार आहे. या फेस्टमध्ये रविवारी (ता.13) विमानाच्या वेगाने आणि स्वस्तात प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याऱ्या व्हर्जिन हायपरलुपचा प्रवास पहाण्याची संधी टेकप्रेमींना मिळणार आहे.

आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट 8 ते 13 डिसेंबर 2020 दरम्यान 'व्हर्चुअल' टेकफेस्ट व्हर्चुअल आयोजित केली आहे. दरवर्षीप्रमाणे देशविदेशातुन विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच 'हायपरलूप' चा वेगवान प्रवास अनुभवता येणार आहे. 'व्हर्जिन हायपरलुप' या कंपनीने वेगवान प्रवासी वाहतुकीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. 'हायपरलुप' तंत्रज्ञानाअंतर्गत एक कॅप्सूल एका लांबलचक नालीमधून प्रवास करेल, ते ही तब्बल 1080 किमी प्रतितास या वेगाने. हा संपूर्ण प्रवास अतिशय आरामदायी आणि मुख्य म्हणजे किफायतशीर देखील असेल. 28 प्रवासीक्षमता असलेली हि कॅप्सूल कोणतेही अतिरिक्त थांबे न घेता तुम्हाला थेट तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवेल.13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता आयआयटी मुंबई टेकफेस्टच्या https://www.youtube.com/user/techfestiitbombay या अधिकृत युट्युब चॅनेल वरून तुम्हाला हि कॅप्सूल लाईव्ह बघता येईल.

The fast journey of Hyperloop at IIT Mumbais Hercule Techfest

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com