आम्हाला घरी जाऊ द्या हो! परराज्यातील 109 मजूरांचे उपोषण

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 एप्रिल 2020

  • घरी परतण्यासाठी त्या 109 जणांचे उपोषण
  • लॉकाडाऊन वाढवल्याने तवा येथील परराज्यातील मजूर संतप्त

कासा : देशातील लॉकडाऊनचा अवधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आल्याने तवा येथील अनेक दिवसांपासून घरी जाण्यास उत्सुक असणाऱ्या 109 परराज्यातील कामगारांनी उपोषण सुरु केले आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

14 एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर घरी परतण्याच्या बेतात असलेल्या कासा येथील 109 कामगारांना लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे आणि त्यांना, आहे तेथेच थांबण्याचे आवाहन करण्यात आल्याने त्यांनी संतप्त होऊन मंगळवारी जेवण न घेण्याचा निर्णय घेतला. प्रसासन, अधिकारी वर्ग, स्थानिक अधिकारी यांनी अनेक विनवण्या करुनही या कामगारांनी अन्नत्याग केल्याने अखेर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी स्वतः लक्ष घालत त्यांना समजावून सांगितले.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

मनधरणीनंतर उपोषण मागे
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचे संकट आपल्या देशावर आले आल्याचे सांगत, पुन्हा एकदा या रोगाची तीव्रता, भयाणता कामगारांना समजावून सांगितली. सर्वांनी सहकार्य करा, तरच हे संकट टळेल. यासाठी प्रांत अधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहुल सारंग, पोलिस ठाणे प्रमुख आनंदराव काळे, तलाठी संतोष मते, मुख्यध्यापाक गजानन पाटील यांनी समजावून मनधरणी केल्यावर अखेर एक दिवसाच्या उपवासानंतर कामगारांनी जेवण घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fasting of 109 laborers in the State