esakal | बापाने वाजवला पोराचा गेम, कारण ऐकाल तर सुन्न व्हाल..
sakal

बोलून बातमी शोधा

बापाने वाजवला पोराचा गेम, कारण ऐकाल तर सुन्न व्हाल..
  • त्या आठ वर्षाच्या पोराचा गुन्हा काय ?

बापाने वाजवला पोराचा गेम, कारण ऐकाल तर सुन्न व्हाल..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबईतील पनवेलमध्ये सध्या दिवसागणिक खून, चोरी अशा गुन्ह्यांचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय. अशातच पनवेलमधून आज देखील धक्कादायक बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. ही बातमी वाचल्यावर कदाचित तुम्हाला सुन्न झाल्यासारखं वाटेल. किंवा तुम्हाला असं काही घडू शकतं यावर विश्वास बसणार नाही.      

नवी मुंबईतील पनवेल भागातून पोलिसांनी एका आठ वर्षाच्या मुलाच्या खुनाच्या आरोपात त्याच्याच वडलांना अटक केली आहे. या क्रूर बापाचं नाव आहे राकेश अंबाजी तांबडे. राकेश हा रिक्षा चालक आहे. त्याचं वय ३२ वर्ष आहे. एका रात्री राकेशचं डोकं फिरलं आणि त्याने आपल्याच मुलाचा खून केला.   

हेही वाचा : मोबाईल घ्यायचाय थोडा थांबा! नव्या वर्षात येत आहेत खास मोबाईल

त्या दिवशी रात्री राकेशचा सावत्र मुलगा झोपत नव्हता. हेच झालं कारण आणि राकेशने त्याच्याच मुलाची हत्या केली. या संबधित गुन्ह्यात राकेशचा मित्र रमेश पाचंगेला देखील पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलंय. राकेशला त्याच्या मुलाच्या शवाची विल्हेवाट लावण्यासाठी याच रमेशने मदत केल्याचा त्यावर ठपका ठेवण्यात आलाय.   

पोलसांनी दिलेल्या माहितीत तांबडे त्याची पत्नी आणि सावत्र मुलगा सुरज पनवेल उपनगरात राहतात. रात्री झोपताना ते रस्त्यालगतच झोपतात. जेंव्हा केंव्हा मुलगा झोपत नसे तेंव्हा तेंव्हा तांबडेचं डोकं फिरायचं.  

हेही वाचा : #CAA वरून मुंबईत नागरिकांचा एल्गार, मुंबई पोलिसांनी उचललं 'मोठं' पाऊल

रविवारी राकेशने मुलगा झोपत नसल्याने त्याचा गळा आवळला आणि त्याचा खून केला. रमेशच्या मदतीने राकेशने मुलाचं शव एका गोणीत भरून रस्त्यावर फेकून दिलं. पोलिसांनी याबाबत तपास करताना राकेशची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान राकेशने स्वतःच मुलगा झोपत नसल्याने राग आल्याने त्याचा गळा घोटून हत्या केली असं स्पष्ट केलंय. नवी मुंबई आयुक्त संजय कुमार यानी याबाबत माहिती दिली आहे. 

WebTitle : father killed his eight years old son just because he was not sleeping on time

loading image
go to top