esakal | फटका गँगला सुरक्षा व्यवस्थेचा 'फटका'; कारवाईचे सत्र सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

local train

फटका गँगला सुरक्षा व्यवस्थेचा 'फटका'; कारवाईचे सत्र सुरुच

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : उपनगरीय लोकल, मेल, एक्सप्रेसच्या (Mumbai train) दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या (train travelers) हातावर फटका मारून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, मोबाइल चोरी (robbery) करण्यासाठी फटका गँग सक्रीय आहे. मागील अडीच वर्षात मध्य रेल्वेवर (central railway) फटका गँगविरोधात तब्बल 597 गुन्हे (FIR) नोंदविण्यात आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मात्र, आता लोकल, मेल, एक्सप्रेसमधील मर्यादित प्रवासी संख्या, सुरक्षा व्यवस्थेची गस्ती, कारवाईचे सत्र सुरू असल्याने मागील चार महिन्यांत फटका गँगच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ( Fatka gang is in control by the railway security system -nss91)

फटका गॅंग अंधार, झाडेझुडपे आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना करतात. एक्सप्रेस, लोकलच्या दरवाज्यावर मोबाईल, मौल्यवान वस्तू हाताळत असलेल्या प्रवाशाच्या हातावर लाकडी किंवा धातूच्या काठीने जोरदार प्रहार करतात. त्यांच्याकडून रेल्वे रुळावर पडलेली सामग्री घेऊन पळ काढतात. या घटनेमुळे अनेक प्रवाशांचा प्राणही गेला आहे. तर, अनेकांना कायमस्वरूपी दिव्यांगता आली आहे. 2019 सालात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तब्बल 519 फटका गँगविरोधात गुन्हांची नोंद झाली आहे. तर, जानेवारी 2020 ते मार्च 2020 या तीन महिन्याचा कालावधीत फटका गँगच्या विरोधात तब्बल 70 गुन्हांची नोंद आहे. वाढत्या घटनामुळे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे ड्रोनद्वारे फटका गँग पाँइंटवर नजर ठेवणे, गस्ती पथक वाढविणे सुरू झाले.

हेही वाचा: मुंबईत कोविडच्या ४४० नव्या रुग्णांचे निदान, तर १३ रुग्णांचा मृत्यू

लोकलमध्ये वारंवार जनजागृतीची उद्घोषणा सुरू

'लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांनी दरवाजाजवळ उभे राहू नये. दरवाज्यात उभे राहून मोबाईलवर बोलू नये', अशा आशयाची जनजागृतीची उद्घोषणा केली जात आहे. दरवाज्यात उभे राहून प्रवास केल्यास प्रवाशांना फटका गँगकडून धोका होऊ शकतो आणि त्यामुळे सुरक्षितरीत्या प्रवास करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा लोकलमध्ये केली जाते. विशेष म्हणजे, ज्या परिसरात फटका गॅंग सक्रिय आहे. त्या परिसरातून लोकलमध्ये उद्घोषणा केली जाते. यातून प्रवाशांना सतर्क केले जाते, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ आरपीेफ अधिकाऱ्याने सांगितले.

जानेवारी ते जूनपर्यंत 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत फटका गॅंगविरोधात दाखल 8 गुन्हे दाखल झाले आहे. यामधील तीन आरोपींना पकडण्यात आले आहे. फटका गँगला संपविण्यासाठी रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या संयुक्त कारवाईमुळे मागील चार महिन्यात फक्त फटका गॅंगविरोधात एकच गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ आरपीएफ अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेवरील कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, कोपरी ब्रिज, ठाणे, पारसिक बोगदा, नाहूर, वडाळा, जीटीबी नगर, किंग्जसर्कल, कोपरखैरणे, ऎरोली, रबाळे, माहिम, सॅडहर्स्ट रोड यासह झाडे-झुडपे असलेल्या ठिकाणी फटका गँग सक्रिय आहे. या ठिकाणी फटका गँगविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यामुळे या परिसरात लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे सुमारे 100 कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे.

loading image
go to top