esakal | एसटीच्या ईटीआय मशीन नादुरुस्त, सणासुदीत उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

 ईटीआय

राज्यातील एसटीच्या सर्व विभागाकडून दूरध्वनी आणि ईमेलद्वारे सातत्याने ईटीआय मशीन नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी विभागाकडून एसटीच्या मुख्यालयाला केली जात आहे. या ईटीआय मशीनचे कंत्राट एसटीने ट्रायमॅक्‍स कंपनीला दिले आहे.

एसटीच्या ईटीआय मशीन नादुरुस्त, सणासुदीत उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : ऐन दसरा-दिवाळीच्या गर्दीच्या हंगामापूर्वीच एसटी महामंडळातील ऑनलाईन तिकीट देणाऱ्या 38,533 ईटीआय मशीनपैकी राज्यभरात 15,037 मशीन नादुरुस्त झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एकूण मशीनच्या तुलनेत तब्बल 39 टक्के मशीन नादुरुस्त असल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

नाथाभाऊंची ताकद महाराष्ट्राला दाखवू, शरद पवार यांचे सूचक विधान
 
राज्यातील एसटीच्या सर्व विभागाकडून दूरध्वनी आणि ईमेलद्वारे सातत्याने ईटीआय मशीन नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी विभागाकडून एसटीच्या मुख्यालयाला केली जात आहे. या ईटीआय मशीनचे कंत्राट एसटीने ट्रायमॅक्‍स कंपनीला दिले आहे. याच कंपनीने नादुरुस्त मशीन दुरुस्तही करायच्या आहेत; मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये नादुरुस्त ईटीआय मशीनची आकडेवारी वाढली आहे; मात्र तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याने वाहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
 
एसटी महामंडळाने नुकतेच ईटीआय मशीनचा आढावा घेतला. त्यामध्ये 15,037 एवढ्या मोठ्या मशीन नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले. सध्या राज्यात 38,533 एकूण ईटीआय मशीन आहेत. त्यापैकी 15,037 ईटीआय मशीन बंद असतानाही नादुरुस्त मशीन आगारास दुरुस्त करून मिळत नसल्याच्या तक्रारीही वाहकांकडून केली जात आहे. 

लॉकडाऊनमुळे बिघाड 
कोव्हिडच्या संक्रमणामुळे एसटीची वाहतूक बंद होती. त्यांनतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, आता दसरा आणि दिवाळीच्या हंगामाची सुरुवात होणार असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करायची असते; मात्र 15,037 ईटीआय मशीन नादुरुस्त असून, दैनंदिन आकडा वाढत असल्याने दसरा-दिवाळीच्या हंगामात उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

विभाग - एकूण ईटीआय - नादुरुस्त ईटीआय - नादुरुस्त मशीनची टक्केवारी 
जळगाव- 1842 - 1105 - 737 - 60 टक्के 
मुंबई- 1077 - 770 - 307 - 71 टक्के 
रायगड (पेण) - 1205 - 733 - 472 - 61 टक्के 
नांदेड- 1194 - 729 - 465 - 61 टक्के 
बुलडाणा- 963 - 726 - 237 - 75 टक्के
 

(संपादन- बापू सावंत)
 

loading image