अतिवृष्टीमुळे हळवे भातपीक कुजण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

वाडा ः वाडा तालुक्‍यात यंदा पाऊस समाधानकारक असल्याने सुखावलेला शेतकरी राजा आता मात्र पिकांसाठी आता पावसाने थोडी विश्रांती घ्यावी, अशी प्रार्थना करत आहे. 

वाडा ः वाडा तालुक्‍यात यंदा पाऊस समाधानकारक असल्याने सुखावलेला शेतकरी राजा आता मात्र पिकांसाठी आता पावसाने थोडी विश्रांती घ्यावी, अशी प्रार्थना करत आहे. 

शेतीसाठी अपेक्षित पडणाऱ्या पावसाने भातांना चांगलाचं जोर दिला आहे. गरव्या भातांच्या चांगल्या फुटव्यांबरोबरच हळव्या (लवकर येणाऱ्या) भातांनीही कणसे धरली आहेत. वाडा तालुक्‍यात जवळपास १४ हजार हेक्‍टर क्षेत्रात भातशेती केली जाते.

यामध्ये गरवे, हळवे, निमगरवे अशी भातपिके घेतली जातात. अगदी काहीच दिवसात पूर्ण कणस भरलेली हळवी भाते शेतकऱ्याच्या हाती येतील, अशी आशा होती; मात्र गेल्या १५ दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे.

आणखी काहीस दिवस पाऊस असाच सुरू राहिल्यास हळवे भात शेतात पडून कुजण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे होमार नुकसान टळावे, यासाठी पावसाने काही दिवस विश्रांती घ्यावी, अशी आर्त विनवणी शेतकरी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of slow paddy rot due to heavy rainfall in Wada taluka