मुंबईत कोरोनाबाधितांचा आलेख चढताच, दररोज 1 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांचा आलेख चढताच, दररोज 1 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई: राज्यात सलग पाचव्या दिवशी 8 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 24 ते 28 फेब्रुवारीपर्यंत मुंबईतही 1 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून मुंबईत आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या फक्त पाच दिवसांमध्ये राज्यात 42 हजार 758 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 24 फेब्रुवारी या दिवशी राज्यात 8,807 नवीन कोरोना रूग्ण सापडले. त्यापाठोपाठ 25 फेब्रुवारीला 8,702, 26 फेब्रुवारीला 8,333 , 27 फेब्रुवारीला 8,623 आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही हा आकडा कायम राहत 28 फेब्रुवारीला 8,293 एवढ्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे या आकडेवारीनुसार, राज्यात फक्त पाच दिवसांत 42 हजार 758 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

मुंबईत ही आलेख चढता

24 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत दररोज 1 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. हीच संख्या जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत 500 ते 600 च्या घरात होती. म्हणजेच, गेल्या आठवड्यापासून दरदिवशी किमान मुंबईत 400 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 

राज्यात सध्या कोविड -19 ची 77,008  सक्रिय 
प्रकरणे आहेत, तर मुंबईत 8,299 सक्रिय रुग्ण आहेत. ज्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

सक्रिय प्रकरणे असलेल्या ठिकाणी सरकारने निर्बंध लावले आहेत. राज्यात पुणे पहिल्या क्रमांकावर असून  15,000 सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या नियंत्रणात यावी म्हणून पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यानंतर, नागपूरमध्ये 10,013 आहे. लॉकडाउनला सामोरे जाणाऱ्या अमरावतीमध्ये 6,599 सक्रिय प्रकरणे आहेत. ठाणे, बुलढाणा, वर्धा, अकोला, औरंगाबाद, वाशिम, जळगाव, अहमदाबाद, सातारा, रायगड आणि नाशिक अशा इतर भागात कोविड -19 चे 1000 पेक्षा जास्त सक्रिय प्रकरणे आहेत. 

सध्या राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख चढता आहे. मात्र, मृत्युदर हा तितकासा वाढलेला नाही. यातील ही जवळपास 80 टक्के रुग्ण सौम्य आणि लक्षण नसलेले आहेत. त्यामुळे, होम आणि संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांनी सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. संक्रमण पसरु नये म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टस्टिंगचे पालन करावे. 
डॉ. अविनाश सूपे, राज्य कोविड टास्क फोर्स सदस्य

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

February last week more than thousand patients being found Mumbai corona Virus

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com