प्लाझ्मा थेरेपीसाठी काही मोजक्यांचाच पुढाकार, राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये 1,143 युनिट प्लाझ्माचा साठा

प्लाझ्मा थेरेपीसाठी काही मोजक्यांचाच पुढाकार, राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये 1,143 युनिट प्लाझ्माचा साठा

मुंबई : कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरलेल्या प्लाझ्मा थेरेपीचा प्रभाव आता कमी झालेला दिसत आहे. कारण, गेल्या काही महिन्यांत प्लाझ्मा थेरेपी घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. काही मोजक्याच रुग्णाचे नातेवाईक प्लाझ्मा थेरेपीसाठी पुढाकार घेत असून राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये 1,143 युनिट प्लाझ्माचा साठा उपलब्ध आहे. रक्तपेढ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याची प्रमुख दोन कारणे आहेत. प्लाझ्मा थेरेपीची शिफारस करणाऱ्या डॉक्टरांच्या सूचनांमध्ये घट झाली आहे आणि बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मा दान करण्याबाबतची जागरूकता वाढली आहे.

काही महिन्यांपूर्वी कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरेपी प्रभावी उपचार पद्धती असल्याचे मानले गेले तसतशी त्याची मागणी वाढली. आता कोविड रुग्णांसाठी कमीतकमी 1,143 प्लाझ्मा युनिट अजूनही रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध आहे. 
प्लाझ्मा थेरेपी म्हणजे कोविड 19 मधून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तात तयार झालेल्या कोरोना व्हायरसच्या विरोधातील अँटीबॉडीज काढून गरज असलेल्या रुग्णाला देणे. जेणेकरुन त्या रुग्णाची वेगवान रिकव्हरी होईल. 
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) शिफारस केली आहे की, कोविड -19 रूग्णाच्या शरीरात तीन ते सात दिवसांच्या आत प्लाझ्माचे संक्रमण केले पाहिजे. पण, आयसीएमआरने असा इशारा देखील दिला आहे की 'प्लाझिड ट्रायल' - जिथे प्लाझ्मा थेरपी कोविड 19 च्या 464 रूग्णांवर वापरली गेली. ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले नाही किंवा आजार तीव्र स्वरुपाने पसरणे ही रोखले गेले नाही. 

2 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारने रक्तपेढ्यांद्वारे प्लाझ्माच्या 17,372 युनिट्सचे वितरण केले होते. ऑक्टोबरपासून प्लाझ्माची मागणी कमी झाली.  मुंबई रक्तपेढीने डिसेंबर 2 पर्यंत 3,390 प्लाझ्मा युनिटचे वितरण केले आहे. तर, पुण्यात 5,981 युनिट आणि ठाणे परिसरात 3,195 युनिट्सचे वितरण झाले आहे.

प्लाझ्माची मागणी आता नगण्य आहे. डॉक्टर रेमेडेसिव्हीर किंवा फॅवीपिरावीर सारख्या अँटी-व्हायरल औषधांना प्राधान्य देत आहेत, आता प्लाझ्मा पुरवठ्याबाबतच्या तक्रारी येत नाही, असे अन्न व औषध प्रशासनातील सहआयुक्त (ड्रग्स) जे बी मंत्री यांनी सांगितले. 
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे प्रभारी डॉ. अरुण थोरात यांना सांगितले, राज्य सरकारने प्लाझ्मासाठी प्रति युनिट 5,500 रुपये दर आकारल्यानंतर रक्तपेढी प्लाझ्मा संकलन करत नाहीत. 

मुंबईत नानावटी रुग्णालयातील रक्तपेढी, एलएचएच हिरानंदानी रुग्णालय, केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय, बीवायएल नायर रुग्णालय, एचएन रुग्णालय आणि जगजीवन राम रुग्णालय तसेच अर्पण, सेवा मंदिर आणि नवजीवन यांसारख्या रक्तपेढींनी प्रत्येकी 200 युनिट्स हून अधिक प्लाझ्मा गोळा करत त्याची गरजूंना विक्री देखील केली आहे. 
सांगली, अकोला, यवतमाळ आणि कोल्हापुरात प्लाझ्मा दानाला कमी प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत गोळा झालेल्या 18,000 पेक्षा जास्त युनिट्सपैकी, 83 युनिट्स रक्त वापरण्याजोगे नसल्याकारणाने आणि त्यात पुरेशा प्रमाणात अँटीबॉडी तया झाल्या नसल्याचे आढळल्याने ते रक्त कोणाला देता आलेले नाही हे देखील सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com