esakal | टेंभी पाडा : गणेशोत्सवात फाईट अगेंस्ट कोरोना लक्षवेधक चलचित्र
sakal

बोलून बातमी शोधा

Tembhi pada Ganpati festival

टेंभी पाडा : गणेशोत्सवात फाईट अगेंस्ट कोरोना लक्षवेधक चलचित्र

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : गणपती (Ganpati festivals) आले कि लगबग सुरु होते ती मखर सजावटीची (Decoration) यात वेगवेगळी चलचित्रे, देखावे बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे तरुण हे गणेशोत्सवात लक्ष वेधून घेत असतात. वसई (Vasai) तालुक्यातील काही गावात अजूनही गावपण शिल्लक असून याठिकाणी हे देखावे उभारण्यावर भर दिला जात आहे. यात जूचंद्र,आणि टेम्बी पाडा हि दोन गावे अग्रेसर असल्याचे नेहमी दिसून आले आहे. त्यात विरारजवळील टेंभीपाडा (Tembhipada) गावात घरोघरी बसलेल्या गणेशाच्या निमित्ताने चलतचित्र देखावे बनवण्यात नेहमीच स्पर्धा लागलेली असते. यंदा कोरोनाचा (corona) काळ असला तरी काही लोकांनी चलतचित्र देखावे बनवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यात पोलीस पाटील शैलेश वैती यांच्या घरातील फाईट कोरोना चलतचित्र यंदाही मुख्य आकर्षण ठरले आहे.

हेही वाचा: कोरोना मृत्यूंमध्ये दहा रूग्णांमागे 3 ते 4 रूग्ण मधुमेहग्रस्त

देशात २० मार्च पासून पसरलेल्या कोविडवर मात करण्यासाठी संपूर्ण देश जिद्दीने लढत आहे. त्यात फ्रंट लाईन वर्कर (डॉक्टर, स्वच्छतादूत, पोलीस, आशा वर्कर) यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भारतवासियांना वाचवले आहे. कोरोना संपला नसल्याने त्यांची महामारीविरोधातील लढाई अद्याप सुरुच आहे.त्यांच्या लढाईत भारतीयांचीही साथ आहेच. या कामाला सलाम करण्यासाठी टेंभीपाडा गावातील वैती परिवाराने सुंदर असा देखावा उभा केलेला आहे.

सामाजिक दरी, हात धुवा, मास्क वापरा, या आजारापासून वाचण्यासाठी लस जरुर घ्या तसेच ऑक्जिनची कमतरता भासू नये म्हणून वृक्ष लागवड करा, असा संदेश सुंदर, मनमोहक देखाव्यात साकारण्यात आला आहे.टेंभीपाडा गावात मांगेला समाजाची वस्ती आहे. गावात घरोघरी गणेशोत्सव साजरा करताना सुंदर देखावे आणि चलतचित्र तयार करण्याची गावकऱ्यांमध्येच् दरवर्षी स्पर्धा लागलेली असते. स्वखर्चातून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकणारे देखावे येथील खास वैशिष्ट आहे. कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यात अनेक बंधने असली तरी गावकऱ्यांनी देखावे तयार करण्यात मात्र खंड पडू दिलेला नाही.

loading image
go to top