भिवंडीतील सोनाळे गावात दोन गटात हाणामारी; निवडणुकीदरम्यान प्रकार

शरद भसाळे
Sunday, 17 January 2021

भिवंडी तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका अनेक ठिकाणी शांततेत, तणावपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या; मात्र सोनाळे गावातील जिल्हा परिषद शाळेबाहेर मतदान करण्यावरून दोन गटांत हुज्जत होत हाणामारीची घटना झाल्याचे उघडकीस आले

भिवंडी -  भिवंडी तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका अनेक ठिकाणी शांततेत, तणावपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या; मात्र सोनाळे गावातील जिल्हा परिषद शाळेबाहेर मतदान करण्यावरून दोन गटांत हुज्जत होत हाणामारीची घटना झाल्याचे उघडकीस आले. या हाणामारीत एकाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटांतील आठ जणांना अटक केली असून शनिवारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

भिवंडी तालुक्‍यातील सोनाळे गावात जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात वयोवृद्धांना मदत करण्यासाठी जाणारे सहकारीच बटण दाबून मत नोंदवत असल्याबद्दल एका गटाने आक्षेप घेतल्याने त्यावरून दोन गटांत बाचाबाची झाली. दरम्यान, मतदान केंद्राबाहेर दुपारी दोन्ही गट जमा होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पिटाळून लावले. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. या हाणामारीत जयनाथ चरपट पाटील याच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली असून दोन्ही गटांतील फिर्यादी अनुक्रमे भावेश पाटील व सुशांत पाटील हे किरकोळ जखमी आहेत.

मुंबई, भिवंडी परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गटाने एकमेकांविरोधात तक्रार दिल्याने रात्री उशिरा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उमेदवार तथा युवक कॉंग्रेस भिवंडी तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह किशोर पाटील, भावेश पाटील, नीतेश पाटील यांच्यासह विरोधी गटातील नवनाथ पाटील, भरत पाटील, लैलाथ पाटील, गणेश पाटील दोन्ही गटांतील एकूण आठ जणांना शनिवारी ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम भालसिंग करत आहेत. 
Fighting between two groups in Sonale village in Bhiwandi Types during elections

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting between two groups in Sonale village in Bhiwandi Types during elections